तुम्हाला दिला जाणारा फ्लॅट क्षेत्रफळ कसं गृहीत धरून दिला जात आहे याचा मुख्यत: विचार करा. प्रत्यक्ष वापरण्याजोगं क्षेत्रफळ आणि विक्रीचं क्षेत्रफळ यात फरक असतो. कार्पेट एरिया हा भिंतींच्या आतल्या भागांपासून मोजलेला असतो. थोडक्यात सांगायचं, तर गालिचा किंवा कार्पेट अंथरलं तर ते किती क्षेत्रफळ व्यापेल हे पाहणं महत्वाचं असतं. काही बिल्डर यात टेरेसचा अर्धा भागही गृहीत धरतात. बिल्ट अप एरियामध्ये भिंतींची जाडी, डिक्ट इत्यादींचाही समावेशही कार्पेट एरियात होतो.
सर्वसामान्यपणे यामुळे फ्लॅटचं क्षेत्रफळ कार्पेट एरियाच्या १0 ते १५ टक्क्यांनी जास्त असतं. सुपर बिल्ट अप एरिया धरला असेल तर त्यात लिफ्ट, जिने, प्रवेश लॉबी, एवढंच नव्हे तर पंप रूम वगैरेचं क्षेत्रफळही धरलं जातं. कार्पेट एरियाच्या सुमारे ३0 टक्क्यांपर्यंत वाढ करून बिल्डर सुपर बिल्ट अप एरियासाठी दर आकारू शकतो. त्यामुळे फ्लॅट खरेदी करताना क्षेत्रफळ कसं मोजलं आहे याचा विचार करा.
Related Stories
November 20, 2023
October 27, 2023
October 12, 2023