फिट राहणं ही मोठी गरज आहे. शरीर फिट असेल तर आपण कितीही धावपळ, दगदग करु शकतो. कार्यक्षम राहून अपेक्षित प्रगती साधू शकतो. हे जाणत असल्यामुळेच फिटनेस मिळवण्यासाठी जीममध्ये घाम गाळला जातो. पण केवळ जीमध्ये जाण्याने फिटनेसचं उद्दिष्ट साध्य होतं असं नाही. जीममध्ये व्यायाम करतानाही अनेक चुका होऊ शकतात. बरेचदा व्यायाम सुरू करण्याआधी वॉर्म अप केलं जात नाही तसंच व्यायामानंतर शरीर ताणण्याचे व्यायाम होत नाहीत. ही सर्वात मोठी चूक ठरते. सकाळी व्यायाम करणार्यांनी वॉर्म अप करणं गरजेचं आहे.
फिटनेसच्या उद्देशाने जीममध्ये जात असाल तर ट्रेड मिलवरचा वर्क आउट चालून जाईल. पण पिळदार शरीर हवं असेल तर फक्त कार्डिओवर अवलंबून राहणं चालण्यासारखं नाही. बारीक असणं सौंदर्याचं लक्षण मानलं जातं. पण प्रत्यक्षात बळकट स्नायू आणि सांधे यावर तुमचं आरोग्य आणि फिटनेस अवलंबून असतो. त्यामुळे महिलांनी वेट ट्रेनिंग हा प्रकार टाळला पाहिजे. भरपूर व्यायाम करून, आहारावर नियंत्रण आणूनही अनेकांचं वजन कमी होत नाही. याचं कारण म्हणजे तुमचं शरीर नव्या गोष्टींना खूप लवकर प्रतिसाद देतं. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर व्यायामाची पद्धत, वेळा आणि डाएटचं तंत्र बदल रहा. यामुळे परिणाम होऊ शकेल. शरीराला सतत बदल हवा असतो. असेबदल करत राहल्यास परिणाम दिसतो.