- दिपावलीच्या शुभ पर्वावर
- लख्ख उजळाव्या दिशा
- जातीधर्माच्या भिंती पडाव्या
- भेदाभेदाने गुंडाळावा गाशा
- दिनदुबळ्यांचे नशिब फळावे
- उतरावी अत्याचारी नशा
- आपसातील मतभेद मिटावे
- संपावी धूर धुक्यांची निशा
- कृध्द विखारी भाषणांच्या
- तलवारीही व्हाव्यात म्यान
- शांत संयमी भारतवर्षाच्या
- पदरी पडावेत हेचि दान
- भ्रष्ट खेळत्या जुगारातून
- रयतेचीही सुटका व्हावी
- मार्ग चुकलेल्या पामरांना
- सत्याचीही वाट दिसावी
- गटातटाचे वदणे वर्जून
- एकात्मतेचे दर्शन व्हावे
- सप्तसुरांच्या मैफिलीतून
- अखंडतेचेही गाणे गावे
- विविधतेने नटलेल्या देशा
- अमंगळाची दिट ना लागो
- या मातीच्या कणाकणातून
- प्रांजळ प्रेमाचे भाव जागो
- -पी के पवार
- सोनाळा बुलढाणा
- ९४२१४९०७३१
—–
Contents
hide