प्रकाश आंबेडकरांचा भाजपावर हल्लाबोल, म्हणाले, ‘लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न’

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

मुंबई : अमित शाह यांच्या विधानावरून निर्माण झालेल्या वादळाने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाबाबत केलेल्या विधानाचा संदर्भ घेत विरोधकांनी सत्ताधारी भाजपावर जोरदार हल्ला चढवला आहे. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी अन्याय केल्याचे आरोप करत पलटवार केला आहे.

मोदी यांनी बाबासाहेबांचा निवडणुकीत दोन वेळा पराभव करण्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या विषयावर काँग्रेसला दोष देण्यास नकार दिला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, त्या पराभवासाठी काँग्रेसला जबाबदार धरता येणार नाही.

प्रकाश आंबेडकर यांनी भाजपावर निशाणा साधताना सांगितले की, भाजप लोकांचे लक्ष मुख्य समस्यांवरून हटवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचा आरोप आहे की, सत्ताधारी पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव वापरून जनतेच्या भावना भडकवत आहे आणि मूळ मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करत आहे.

अमित शाह यांनी केलेल्या विधानानंतर विरोधकांनी त्यांच्याकडून सार्वजनिक माफीची मागणी केली आहे. मात्र, भाजपा काँग्रेसवर बाबासाहेबांचा अपमान केल्याचा ठपका ठेवत बचावात्मक भूमिका घेत आहे. हा वाद निव्वळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक योगदानाच्या चर्चेपुरता मर्यादित राहिला नसून, आगामी निवडणुकांच्या रणनीतींचाही एक भाग बनत असल्याचे दिसते. भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आंबेडकर यांच्या वारशाचा वापर करून राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

(छाया : संग्रहित)

Leave a comment