Skip to content
कापलेले झाड आहे, पेटते हे रान आहे
जंगलाच्या पाखरांची, आज दानादान आहे
वात,पाण्याने विषारी, जीवनाचा घात होतो
माणसाने माणसाचा, कोंडलेला प्राण आहे
वाचवावे यामधूनी, माळरानी पामरांना
वाढलेल्या संकटाची, मानवाला जान आहे
वृक्ष लावा एक आता,श्वास घेण्या मोकळा हा
नेक कामी साथ देण्या,का कुणावर तान आहे
राबती जे लोक तेथे, पोज त्यांची येत नाही
लावती झाडे कुणी ना, का तयाना मान आहे?
मग सकाळी रोज धावा, वाढवा आयुष्यमाना
श्वास घेतो दाम आता, का कुणाला भान आहे
फोटो सौजन्य : संदेशजी तुपसुंदरे
Like this:
Like Loading...