पाठदुखी ही अनेकांना त्रास देणारी मात्र अनेकांकडून दुर्लक्षित राहणारी शारीरिक समस्या आहे. मात्र तिच्याकडे दुर्लक्ष करण्याचा अनेकांचा स्वभाव असतो. अर्थातच ही बाब घातक ठरु शकते. अद्यापही पाठदुखीचं निदान अवघड असल्यामुळे नेमके उपचार न मिळाल्यानं पाठदुखीचा त्रास वाढत जातो. पाठीचे मणके, त्याला जोडणारे सांधे आणि त्यामधील डिस्क हे महत्त्वाचे घटक असतात. यापैकी कोणत्याही घटकाला इजा झाली तर पाठदुखी सुरू होते. पाठदुखी फक्त शस्त्रक्रियेनंतरच बरी होते असं नाही. ९0 टक्के रुग्ण इतर औषधोपचारांनीच बरे होतात. पाठदुखी किती काळ सुरू आहे, त्यानुसार तिचं गांभीर्य ठरतं. तसंच पाठदुखी दूर करण्यासाठी व्यायाम सांगितले जातात आणि रेडिओ फ्रिक्वेन्सीसारख्या पद्धतींचाही वापर केला जातो. स्लीप डिस्कमध्ये मणक्याच्या मध्यभागी वेदना होतात. डिस्कच्या नसांवर दाब दिल्यास वेदना पाठीपासून पायांपर्यंत जातात. सांध्याच्या दुखण्यात वेदना मणक्यांच्या बाजुला असते. मागे वाकल्यावर ती वाढते. डिस्कच्या दुखण्यात पुढे वाकल्यावर वेदना वाढते. मात्र विशिष्ट प्रकारची पाठदुखी असेल तर तिला शस्त्रक्रियेखेरीज इलाज नसतो. अशा वेळी शस्त्रक्रिया टाळणं घातक ठरतं. म्हणूनच पाठदुखीकडे दुर्लक्ष न करता किंवा जाहिरातींवर विसंबून उपचार करत न राहता डॉक्टरांकडून योग्य निदान करून घेतलं तर पाठदुखी उत्तम प्रकारे बरी होते. रुग्ण आरोग्यपूर्ण जीवन जगू शकतो.
Related Stories
September 3, 2024