Skip to content
रखरखता अग्नी अंगावर पांघरून
कधी रानात तर कधी रस्त्याच्या दुतर्फा
येणा-या-जाणा-यांना ,पशू-पक्ष्यांना,
चिडी-मुंग्याना, भुंग्यांना मोहीत करीत असतो, विनामूल्य क्षुधा शमवित.
एरव्ही मात्र सर्व ऋतूत तो निर्वंश भासतो
पण फुलण्यासाठी वसंताची वाट बघतो
त्याची रक्तवर्णी फुलंही आमच्या आयुष्यात रंग भरण्यासाठी तत्पर असतात सदैव.
आणि फाल्गुन मासात सर्वांना
उघडा-बोडखा उन्हाचे प्रहार बिनबोभाट.
काही माणसाचंही अशीच तपतात,जळतात
पण आम्ही लोक हव्यासापोटी त्याचे हात-पाय धडापासून वेगळे करतो निर्दयीपणे,
त्याला अधू करून सोडून देतो पाण्याविना निराधार तडफडत जगण्यासाठी.
झाड,माणूस बणण्याचा जीव ओतून प्रयत्न करीत असतं,
आपलं सर्वस्व इतरांच्या सेवेसाठी पणाला लावित असतं
पण माणसातील माणूस मात्र बणताना दिसत नाही
ते सर्वानांच सारखंच प्रेम देतं
याचंच दुःख कायम मनात सलतं
येथेच तर खरं पाणी मुरत असतं.
माणसातील माणूस तरी होता आलं पाहिजे
(“पिंपळ व्हायचंय मला ” या कवितासंग्रहामधून)
Like this:
Like Loading...
Related