दोस्तांनो, परफ्युमचा वापर काही खास समारंभासाठीच करायचा अशी स्थिती आता राहिलेली नाही. आजकालची तरूणाई परफ्युमच्या नियमित वापरावर भर देत आहे. परंतु परफ्युमचा सुगंध अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी काय करावं, असा प्रश्न पडतो. त्यासाठीच्या या टिप्स..
डोक्यावर परफ्युम मारता येईल. आश्चर्य वाटत असलं तरी हे खरं आहे. केसांमध्ये मारलेला परफ्युम जास्त काळ टिकू शकतो. कंगव्यावर परफ्युम मारूनही तुम्ही केस विंचरू शकता. मानेलगतच्या भागाचं तापमान शरीराच्या इतर भागापेक्षा जास्त असतं. त्यामुळे मानेवर परफ्युम मारा. सुगंध जास्त काळ टिकेल. दंडावर परफ्युम मारा. यामुळे सुगंध बराच काळपर्यंत टिकून राहल. छातीवर परफ्युम मारा. याचा मंद सुगंध बराच काळ टिकून राहील. कानांच्या वरच्या भागावरची त्वचा तेलकट असते. तथं परफ्युम मारता येईल. तेलकट त्वचेवर हा जास्त काळ टिकतो. शरीरातल्या नसा उष्णता बाहेर टाकतात. यामुळे इथे फवारल्यास परफ्युमचा सुगंध अधिक काळ टकेल. मनगटाच्या लगतच्या नसांमुळे हा सुगंध बराच काळ टिकतो.
कपड्यांवर परफ्युम मारा. कपड्यांवरचा सुगंधही बराच काळ टिकतो.
Related Stories
September 3, 2024