- एका पक्षातून । दुसऱ्या पक्षात
- धावणारी जात । चहूकडे
- प्रश्न अस्तित्वाचा । उरलाय कुठे
- झाले आडमुठे । व्यवहार
- कोण कशासाठी । लढतो कळेना
- विकास चालेना । पुढे काही
- चिन्ह बदलून । साधले हो काय !
- छाटलेत पाय । हिंदुत्वाचे
- जिंकलो हरलो । रोजचा तमाशा
- वाजतोय ताशा । दिनरात
- सामान्य जनता । मुकाट बिचारी
- सोसून लाचारी । जगतेय
- तुम्हा वागण्याची । येतेय शिसारी
- घेतली सुपारी । भ्रष्टतेची
- सुधरा रे आता । बस करा दंगा
- महाराष्ट्र नंगा । करू नका
- वादविवादाला । द्या पूर्णविराम
- करोनी प्रणाम । एकमेका
- -मीना शेळके
- संगमनेर
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–