- दबावाच्या राजनितिची
- जनता ठरत असते बळी
- फुल उमलायच्या आधी
- कोमेजून जात आहे कळी
- अवजारातून व्यापार
- व्यापारातून अवजार
- विनाशकारी युद्ध पेटलं
- साता समुद्राच्या पार
- अणु युध्दाच्या भितीनं
- पार हादरून गेले देश
- कालांतरानं पांघरेल
- युक्रेन चिंध्यांचा वेष
- एकमेकांवर कुरघोडीचा
- साधला आहे मानवी डाव
- पाणी नाही प्यायला तेथे
- खायला मिळे नाही पाव
- १ल्या २ऱ्या महायुध्दानं
- जिरलीच नाही जगाची
- कोणती किंमत मोजावी
- लागेल अमानवी रागाची
- मानव झाला बे-लगाम
- बेचिराख करून सोडा
- विज्ञान युगाची धास्ती
- जगाला जमिनीत गाडा
- -पी के पवार
- सोनाळा बुलढाणा
- ९४२१४९०७३१