- देश माझा प्राण । देश माझा श्वास ।
- लागे मज ध्यास । देशकार्या ।।
- लिहतो, बोलतो । वाचतो, ऐकतो ।
- बघत चालतो । सत्यधर्म ।।
- खोट्याची संगती । मज आवडेना ।
- मज बघावेना । अधर्मास ।।
- देशसेवेसाठी । सज्ज मरण्यास ।
- शत्रू मारण्यास । भिणे नाही ।।
- देश आधी आहे । प्राण आहे मग ।
- जिंकण्यास जग । सज्ज राहू ।।
- रुधिरासोबत । देशभक्ती वाहे ।
- हृदयात आहे । देशप्रेम ।।
- धनासाठी नाही । देशासाठी जिणे ।
- सैन्य संगतीने । लढायचे ।।
- भारत मातेच्या । कुशीत खेळणे ।
- जगणे, मरणे । देशासाठी ।।
- अजु भारतीय । सेवक बनेल ।
- देशाशी असेल । प्रामाणिक ।।
- -अजय रमेश चव्हाण,
- तरनोळी
- ता.दारव्हा, जि.यवतमाळ
- मो.८८०५८३६२०७
- (Images Credit : Hindihaat)