गर्भात वाढवते लेकराला
नवू मासाच्या या वेदना
सहन करते वाढवण्या नव पिढीला
स्वतःला सिद्ध करण्यासाठी
असंख्य बळी बलिदानाची
कधी वनवास भोगते जगण्या
चाक चालवया संसाराची
शिक्षण घेण्यासाठी
ती लढते समाजाशी
मान राखण्यासाठी ती
सतत संघर्ष करीते स्वतःशी
लग्न करुनी संसाराची
गाडी चालवते ती
बंध डोळ्यातील अश्रू सारे
पापण्यात लपवते ती
स्वप्न नाकरूनी जगते ,हसते
विसरुनी सारे स्वप्न
सर्वांना ती हसवून देखील
किती कठीण तिचे जगन
बायको हवी सर्वांना
मग मुलगी च का नाही?
प्रेम हवंय बस तिला जगताना
नाही तिची अपेक्षा काही
-प्रतिक्षा गजानन मांडवकर (स्वप्न डोळ्यातले)
8308684865