दोस्तांनो, कोरोनाने आपल्याला निरोगी आयुष्याचं महत्त्व पटवून दिलं आहे. व्यायाम, सकस आहार आणि संतुलित जीवनशैलीच्या बळावर आपण तंदुरुस्त राहू शकतो. पण कामाच्या गडबडीत व्यायामाला फाटा दिला जातो. मित्रमंडळींसोबत फिरताना जंक फूड खाल्लं जातं. आजच्या दिवस खाऊ म्हणत आपण पोटभर खाऊन घेतो. यामुळे आपलं आरोग्य धोक्यात येतं. नव्या वर्षात अनेकांनी तंदुरूस्त राहण्याचे संकल्प केले असतील. हे संकल्प तडीस नेण्यासाठी काही स्टेप्स फॉलो करा.
सगळ्या वाईट सवयी एकदम सोडू नका. एक-एक पाऊल पुढे टाका. रोज चार कप चहा होत असेल तर दोनवर आणा. आठवड्यातून तीन वेळा बर्गर-पिझ्झा खात असाल तर प्रमाण एकवर आणा. अशाप्रकारे हळूहळू चुकीच्या सवयी मोडा.
भरपूर पाणी प्या. बरेचदा पाणी पिण्याकडे दुर्लक्ष होतं. पण भरपूर पाणी प्यायल्याने बर्याच समस्या दूर होतात. प्रचंड आवडणार्या पदार्थांपासून लांब राहा. समजा तुम्हाला पिझ्झा खूप आवडतो. एका वेळी तुम्ही भरपूर पिझ्झा खाता. मग तो खाऊ नका किंवा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करून खा. नकार द्यायला शका. यामुळे दिवसभरात शरीरात कमी कॅलरी जातील आणि वजनही कमी होईल.
टू-व्हिलर बाजूला ठेवा आणि भरपूर चाला. भाजी आणायला जायचंय? चालत जा. मित्राकडे निघाला आहात.. बाईककडे बघूही नका. शक्य तितकं आणि शक्य तिथे चाला. बाईकचा वापर कमीत कमी करा. घरातली कामं करा. जिने चढा. शक्य तितकी हालचाल करा. यामुळे अतिरिक्त कॅलरी खर्च होतील.
धावण्यामुळे वजन कमी होतं असा अनेकांचा समज असतो. पण प्रत्यक्षात असं काहीही नाही. अतिखाण्यामुळे वजन वाढतं. व्यायामामुळे कॅलरी खर्च होतात. वेट ट्रेनंग हा व्यायामाचा खूप चांगला प्रकार आहे. कार्डिओपेक्षाही वेट ट्रेनिंगकडे वळा. यामुळे तुम्ही बळकट व्हाल. स्नायू पीळदार बनतील. इन्शुलिनची क्षमता वाढेल आणि तुम्ही जास्त खाऊ शकाल.
Related Stories
November 20, 2023
October 27, 2023
October 12, 2023