बोलके आणि पाणीदार डोळे सौंदर्याला वेगळं परिमाण देऊन जातात. भरगच्च, लांबसडक पापण्यांमुळे डोळे अधिक सुंदर दिसतात. त्यामुळेच पापण्या विरळ, निस्तेज असतील तर महिला कृत्रिम पापण्यांचं साह्य घेतात. विविध रंग, आकार आणि मटेरिअलमध्ये अशा पापण्या बाजारात उपलब्ध आहेत. सध्या निऑन ग्रीन, निळ्या, गुलाबी, पोलका डॉटवाल्या पापण्या महिलांना आकर्षित करत आहेत. या पापण्या वजनाला अत्यंत हलक्या असतात. त्या पिसापासूनही तयार केल्या जातात. त्यांची किंमत ५00 रूपयांपासून हजार रूपयांपर्यंत असते. तुम्ही त्या पाच ते दहा वेळा वापरू शकता. पण या पापण्या लावताना काळजी घ्यायला हवी. मध्यम आकाराच्या पापण्या मध्यभागी तर लांब आकाराच्या पापण्या कडेला लावा. कृत्रिम पापण्या लावणार असाल तर मेकअप साधाच ठेवा. पापण्या नीट चिकटवायला विसरू नका तसंच पापण्या लावल्यावर मस्काराही लावा. सध्याचे लग्नसराईचे दिवस पाहता ही हटके अँक्सेसरी ड्रेसिंग टेबलमध्ये असायलाच हवी. थीम पार्टीसाठी तुम्ही अशा पापण्या कॅरी करू शकता.
Contents
hide
Related Stories
October 31, 2024
October 19, 2024
September 3, 2024