मी पडतो जी तुमच्या पाया
ह्या झेडपी च्या शाळेत भाऊ
माह्य पोरग गेलं हो वाया !!
शहरातून रोज गुरूजी
तुम्हीच येणं जाणं करता
तुमचे लेकरं तुम्ही राज्या
मोठ्या शहरात शिकवता !!
शहरी शिक्षणाचा प्याटर्न
आता गावात आणा हो माह्या
ह्या झेडपी च्या शाळेत भाऊ
माह्य पोरग गेलं हो वाया !!
ह्या बुचू बुचू कोचिंग शाळा
आता सर्व गावोगावी झाल्या
शिक्षणाचा हो काळा बाजार
झाला शिक्षणसम्राट वाल्या !!
गुरू, दलाल चोर आवरा
जनता करते हो गयावया
ह्या झेडपी च्या शाळेत भाऊ
माह्य पोरगं गेलं हो वाया !!
सुधरिल काय हो शिक्षण ?
का मास्तर होतील गायब ?
तुम्हीच सांगा गुरुजी माहय
पोरगं होईल का सायेब ?
गोरगरीब लेकरायची
आता तरी येऊ द्या हो दया
ह्या झेडपीच्या शाळेत भाऊ
माह्य पोरगं गेलं हो वाया !!
गुरुच साक्षात परब्रम्ह
यावे तुम्ही वचन पाळाया
रिकामे धंदे सोडून सारे
गुरू वाचवा शिक्षण पाया !!
समान गणवेष असावा
असावे समानच शिक्षण
राजकारण मुक्त असावे
मोफत सक्तीचेच शिक्षण !!
नको जात धर्म पंथ तेथे
असो माणसात दयामाया
आबादणी होईन सारीच
जाणार नाही कोणीच वाया !!
वासुदेव महादेवराव खोपडे
सहा पोलीस उपनिरीक्षक(सेनी)
अकोला 9923488556
(Emage Credit : Hindustan Times)