युनेस्को व लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाला. या पुरस्काराची किंमत रु.७ कोटी इतकी होती. जगभरातील १४० देशांतील १२,००० पेक्षा अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून रणजितसिंह डिसले यांची निवड झाली आहे. क्यू .आर कोड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रच नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती रणजितसिह डिसले यांनी केली आहे. विशेष म्हणजे, पुरस्काराच्या एकूण रकमेपैकी ५०% रक्कम डिसले सरांनी अंतिम फेरीतील ९ शिक्षकांना देण्याचे जाहीर केले. यामुळे ९ देशातील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल. डिसले यांना मिळालेली रक्कम ते टीचर इनोवेशन फंडाकरिता वापरणार आहेत. ही अभिमानाची बातमी एक दिवस अचानक जगभर झळकली आणि महाराष्ट्राचं नाही तर संपूर्ण भारत देश आनंदित झाला.
जे कालपर्यंत जगाला माहित नसलेले रणजितसिंह डिसले गुरुजी सर्वाना परिचित झाले. ही बातमी खरोखरच खूप प्रेरणादायी आहे व आदर्श घेणारी सुद्धा आहे. काय आदर्श घेता येईल बरं ?
- अव्वल शिक्षण कुठेही घेता येत
कालपर्यंत आपण जिल्हा परिषदच्या शाळेतील शिक्षणाला निम्नस्तरा वरील समजत होतो व त्याच जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने त्रिलोकी झेंडा लावला. चांगले शिक्षण म्हणजे खासगी शाळा, कॉन्व्हेंट, सि.बी.एस.ई. पॅटर्न ह्याचाच जिकडे जिकडे कौतुक. १००% निकाल, शिस्त, संस्कार म्हणजे शहरातील जिल्ह्याच्या ठिकाणच्या शाळा. पण डिसले गुरुजींनी आपला हा गोड गैरसमज दूर केला.
गुणवत्तेला व सृजनशीलतेला कुठेही वाव असतो : जर गुणवत्ता व सृजनशीलता असेल तर ती जगाच्या पाठीवर कुठेही सिद्ध केल्या जाते. तिची पारख अर्थातच किंमत होत असते. आज गरज आहे गुणवत्ता आणि सृजनशीलतेला चालना देण्याची.
मेहनती शिवाय पर्याय नाही : रणजितसिंह डिसले सरांची संपूर्ण जगाने त्यांची विद्वत्ता बघितली. परंतु ह्या यशा मागे त्यांची मेहनत नाही बघितली. त्यांचे यश हे आजचे नसून ही गेल्या १० वर्षाचे परिश्रमाचे फळ आहे. म्हणजेच यश मिळवण्यासाठी मेहनत घेणे फार गरजेचे आहे.
कितीही कठीण स्पर्धेत उतरता येत : डिसले गुरुजींनी जगभरातील १४० देशातील स्पर्धकांना आवाहन देऊन आपली गुणवत्ता शुद्ध केली. म्हणजेच काय तर स्पर्धे मध्ये आपण कुठेहि सिद्ध होऊ शकतो. जर आपणाकडे गुणवत्ता असेल तर जगात त्याला तोड नाही. आपण स्पर्धा म्हटली की अगोदरच पराभूत होऊन जातो. त्याला सामोरे जात नाही. कदाचित आपल्या बुद्धिमत्तेची आपल्याला क्षमता माहित नसते.
- देण्याचा भाव
डिसले गुरुजींना ७ कोटींचा पुरस्कार मिळाला. परंतु डिसले गुरुजींनी ह्याच पुरस्काराची अर्धी राशी आपल्या स्पर्धकांना वाटून टाकली. ते स्वयं केंद्रित किंवा त्यांनी त्यांचा स्वार्थीपणा नाही दाखविला. त्यांनी देण्याचा भाव दाखविला. मी सुद्धा समाजाचे देणे लागतो व आपण दिले पाहिजे हा संदेश दिला. माझ्या पुरस्कारामुळे बाकी इतर सुद्धा ज्ञानी, शिक्षित झाले पाहिजे हा पण संदेश दिला.
- नवं नवीन शिकण्याचा प्रयत्न
डिसले गुरुजींनी तेच तेच रूढी परंपरागत चालत आलेल्या शिक्षण पद्धतीवर जोर न देता नवं नवीन शिकण्यावर विद्यार्थ्यां समोर आदर्श ठेवला. ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी मुलांना आवडेल अश्या शिक्षण्याच्या नवं नवीन पद्धती शोधल्या. क्यू .आर कोड पुस्तक ह्यातील त्यांची सर्वोत्तम सृजनशीलतेचे उदाहरण आहे.
आज मुलां समोर स्काय इस द लिमिट हा आदर्श आहे. येणारी पिढी ही खूप काही तर्क, विचार करून आपल्या बुद्धिमतेला वाव देऊ शकते. आपल्याला कितीनी अडचणी असतील पण आपण मत करू शकतो हे त्यांनी कृतीतून करून दाखविले.
जे डिसले सरांना दिसले ते आपण सर्वाना दिसले पाहिजे.
रणजितसिंह डिसले सरांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा !
- अरविंद सं. मोरे
- अतिथी संपादक
- गौरव प्रकाशन
- नवीन पनवेल पूर्व मो. ९४२३१२५२५१.