- ओढ माहेरा लागता
- धाव घेती पुढे पाय
- वाट तान्ह्या वासराची
- पाही गाय रुपी माय
- चार दिसाचे माहेर
- देई सुख ते मनास
- जीव विसावतो थोडा
- मिळे आराम तनास
- भावा बहिणीची भेट
- ताई मारी घट्ट मिठी
- ओल नात्यात पाझरे
- होती आप्त भेटीगाठी
- पाय माहेरी पडता
- वाहे आठवांचा पूर
- मन होऊन बेभान
- भुतकाळी मारी सूर
- माहेरचा गार वारा
- देई अल्हाद गारवा
- मन प्रसन्न करतो
- बा चा शिवार हिरवा
- ताट आयते समोर
- वाढी भावजय खास
- लेक माहेरात खाई
- आनंदात चार घास
- मामा सांभाळीतो भाचे
- मिळे बहिणीस शांती
- थोड्या दिसात माहेरी
- तिची उजळते कांती
- चार दिसाचा विसावा
- फक्त माहेरात मिळे
- जन्म नारीचाच घ्यावा
- तेव्हा त्यास अर्थ कळे
- आई बाप होती खिन्न
- लेक निघता सासरी
- प्रश्न विचारती एक
- कधी येशील माघारी
- -युवराज गोवर्धन जगताप
- काटेगाव ता. बार्शी
- जिल्हा सोलापूर
- 8275171227
—–
(Images Credit : Deshonnati)