- *मायेचे पांघरूण
- उरलेल्या कपड्यापासून
- गोधडी आई शिवायची
- वेगवेगळं कला कौशल्य
- त्यात ती मस्त दाखवायची.
- जुन्या तिच्या पातळाचे
- थर ती त्यावर रचायची
- दोन तीन थरा नंतर पुन्हा
- एक नवीन थर अंथरायची.
- उलटी सुलटी करून सुईने
- मोठे धाग्याचे चौकट करायची
- बारीक शिवणीच्या टाक्यांनी
- सुंदर कला त्यात काढायची.
- मुलापासून सगळ्यां नातवंडांना
- शिवून दिल्या गोधड्या मायेच्या
- आई नाही राहिली माझी आता
- गोधड्या आहेत तिच्या उबेच्या.
- आईची आठवण होते तेव्हा
- मायेच्या पांघरुणात मी शिरते
- गोधडीच्या वासाने आईचा हात
- प्रेमळ फिरल्यागत मला वाटते.
- -शोभा वागळे
- * शोभाची लेखणी