- वाचन करता करता
- गुरुजींची आली आठवण
- एक एक करून येत होती
- मनात झालेली साठवण
- जुन्या पुराण्या काळात
- गुरुजींना मोठा होता मान
- आता मात्र जो येतो तो
- धरू पाहतो गुरुजींचे कान
- बदनामीचे डोहाळे तर
- येतच असतात अनेकांना
- समाजाने कधी सोडलं नाही
- शाळेतील मोती माणिकांना
- आदर्श व्हा जागतिक व्हा
- कुठे आम्हाला फरक पडतो?
- तुमचं प्रामाणिक वागणं
- आज प्रत्येकालाच नडतो
- एखाद दुसरा चुकला असेल
- बदनाम सारा समाज होतो
- उरलेल्या सर्व सज्जनांचा
- बघा कोण इथे दखल घेतो?
- पण एक गोष्ट सांगू का गुरुजी?
- आरोपांच्या फैरींनी जावू नका थकून
- आणखी बरेच आहेत हो समाजात
- जे आजही करतात नमस्कार वाकून
- -पी के पवार
- सोनाळा बुलढाणा
- ९४२१४९०७३१