हिवाळ्यामध्ये जास्त भूक लागते. त्यामुळे बर्याचदा प्रमाणापेक्षा जास्त खाल्लं जातं. वारंवार तेलकट, तुपकट, गोड खाल्ल्यामुळे वजन काटा झपझप पुढे सरकतो. वाढत्या वजनामुळे अनारोग्याच्या तक्रारी वाढण्याची दाट शक्यता असते. पण घाबरण्याचं कारण नाही. स्वयंपाकघरातल्या समृद्ध खजिन्याचा वापर करून वजन कमी करता येतंच त्याचबरोबर शरीराच्या शुद्धीकरणाचा उद्देशही साध्य करता येतो. याबद्दल अधिक जाणून घेऊ या..
सणासुदीच्या तसंच लग्नसमारंभांनिमित्त खाणं जास्त झालं असेल तर पुढचे काही दिवस कोथिंबीर बारीक वाटून गरम पाण्यासोबत घ्यावी. हा उपाय केल्याने शरीरातील विषारी घटक निघून जातात आणि शरीराचं शुद्धीकरण होतं. तुळशीच्या पानांमधली पाचक तत्त्वं पचनसंस्थेचं कार्य सुरळीत राखण्यास मदत करतात. यामुळे चयापचय क्रियाही सुधारते. अतिखाण्यानंतर तुळशीची पानं चघळल्याने पचन योग्य पद्धतीने होऊन वजन आटोक्यात राहतं. पुदन्याची पानं वाटून पाण्यासोबत घेतल्यास गुणकारी ठरतात. ही पानं नुसतीही चघळता येतात. अतिखाणं झाल्यानंतर पुढचे सात दिवस आहारात कढीपत्त्याचा समावेश करायला हवा.
Related Stories
November 20, 2023
October 27, 2023
October 12, 2023