- मीच मोठा सत्यवान
- म्हणती जगात सारे
- बळेच आव आणून
- नाचती जगात सारे
- झाकून सुर्य कधीच
- लपणार नाही बारे
- कुट्ट अंधारी तसेही
- चमकती हेच तारे
- अडवा किती तयाला
- बांधून भिंती न दारे
- उखडून फेकतांना
- दिसतात हेच वारे
- कांचन तेच कांचन
- करणे न लागे गोरे
- सोन्यात जीव पितळी
- रंगून मिळेल कारे
- असत्य भाषणातून
- बोंबला कितीही मारे
- बदलून जाणे नाही
- असे खरे तेच खरे
- -पी के पवार
- सोनाळा बुलढाणा
- ९४२१४९०७३१