- दु :ख होई मनी।
- श्रद्धांजली दिनी॥
- गुंफितो चरणी ।
- शब्दांजली ॥१॥
- लक्ष्मीबाई एक।
- सज्जन शालीन॥
- सर्वांचा सन्मान ।
- करितसे ॥२॥
- मुलांना मुलींना।
- सुसंस्कार दिले ॥
- मन घडविले ।
- तयांचेच॥३॥
- लक्ष्मी आईचा हा।
- स्वभाव तो नम्र ॥
- वर्तन विनम्र ।
- जीवनात॥४॥
- दररोज होई।
- मधुर स्मरण॥
- उदास हे मन।
- सर्वांचेच ॥५॥
- स्मृतींना नमन।
- आज हे स्मरण ॥
- होई क्षण क्षण ।
- लक्ष्मीबाई ॥६॥
- करद्वयांनी मी।
- नमन करितो ॥
- मनाने वाहतो।
- श्रद्धांजली ॥७॥
- -प्रा अरुण बाबारावजी बुंदेले,
- रुक्मिणीनगर ,अमरावती.
- भ्र.ध्व.:-८०८७७४८६०९.