मोकळे केस कितीही सुंदर दिसत असले तरी कामाच्या गडबडीत ते सावरणं कठीण होतं आणि हाताला लागेल ते रबर घेऊन आपण वर बांधून टाकतो. पण यामुळे केस खराब होतात, गळतात. रबराने घट्ट बांधल्याने केसांचं बरंच नुकसान होऊ शकतं. म्हणूनच अशा चुका टाळायला हव्या.
ओले केस बांधून ठेवल्यास नुकसान होतं. म्हणूनच केस धुतल्यानंतर काही काळ मोकळे सोडा. केस पूर्णपणे वाळू द्या. ओले केस बांधून ठेवल्याने कोंडा, खाज अशा समस्या निर्माण होतात.
घट्ट बांधण्यासाठी केस मागे ओढल्यामुळे मुळांवर ताण येतो. केसांलगतच्या ग्रंथी दुखावतात आणि केस गळू लागतात. झोपताना केस बांधून ठेवल्यामुळे नुकसान होऊ शकतं. झोपेत असताना केस वेडेवाकडे ताणले जातात.
कडक बॅण्डने केस बांधल्यामुळे केसांलगतच्या ग्रंथींचं नुकसान होतं. एकाच ठिकाणचे केस बांधल्याने त्या भागातल्या ग्रंथी दुखावतात आणि टक्कल पडू लागतं. म्हणूनच बो किंवा पोनी बांधण्याऐवजी सरळ वेणी घाला. यामुळे केस बांधलेले राहतातच शिवाय मुळांना धोका पोहोचण्याचा धोका कमी होतो.
Related Stories
September 3, 2024