केक कापताय?.. सावधान.!

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

वाढदिवस म्हटला की केक हा आलाच. फक्त वाढदिवशीच नाही तर लग्नाचा वाढदिवस आणि आनंदाच्या इतर प्रसंगातही केक कापण्याचं प्रमाण वाढलं आहे. केकवर लावलेल्या मेणबत्त्या फुंकर मारून विझवल्या जातात. मात्र या कृतीमुळे तुम्ही आजारी पडू शकता, असं कोणी सांगितलं तर आपला विश्‍वास बसणार नाही. पण हे खरं आहे. अशाप्रकारे मेणबत्त्या विझवल्यामुळे केकच्या पृष्ठभागावर जंतू पसरण्याचा धोका तब्बल १५ हजार पटींनी वाढतो. अमेरिकेत केलेल्या एका संशोधनातून ही बाब समोर आली.
दक्षिण कॅरोलिना प्रांतातल्या क्लेंम्सन विद्यापीठातल्या संशोधनून काही धक्कादायक बाबी समोर आल्या. कोणत्याही उष्ण घटकामुळे एअरोसोलची निर्मिती होते आणि हेच एअरोसोल बॅक्टेरियांच्या वाढीला कारणीभूत ठरतं, असं संशोधनकांचं म्हणणं आहे. या अभ्यासासाठी शास्त्रज्ञांनी आयसिंग असलेल्या केकच्या एका तुकड्यावर काही पेटवलेल्या मेणबत्त्या लावल्या. त्या विझवल्यानंतर साधारण पंधरा मिनिटांनी केकवरच्या जंतूंच्या वाढीची नोंद करण्यात आली. मेणबत्त्या पेटवण्याआधीच्या जंतूंच्या प्रमाणाचीही नोंद घेण्यात आली होती. यात मेणबत्त्या विझवल्यानंतर केकवरच्या जंतूंच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं निरीक्षण शास्त्रज्ञांनी नोंदवलं. इतकंच नाही तर मेणबत्त्या विझवल्यानंतर निर्माण झालेल्या आद्र्रतेमुळे केकवर तब्बल १00 प्रजातींचे जीवाणू आढळून आले. त्यामुळे पुढच्या वेळी केकवरच्या मेणबत्त्या विझवताना काळजी घ्यायला हवी.

Leave a comment