- जो तो पिकवितो
- असत्याचे मळे
- भासवून डोळे
- सत्यप्रिय.
- अनीति, अन्याय
- रक्तामध्ये ज्याच्या
- हातांमध्ये त्याच्या
- विश्वचेंडू.
- असत्याच्या हाती
- अनीतिचा हात
- काजळली वात
- समतेची.
- असत्येश्वराचे
- वाढले पुजारी
- सत्याचे कैवार ी
- दुर्मिळले.
- कसं गावं गीत
- अमर सत्याचं
- वारं असत्याचं
- वाहताहे.
- सत्याचा खराटा
- द्या हो जोतिराव
- असत्याचं गाव
- झाडावया…!
- – मिलिंद हिवराळे
- बार्शिटाकळी, जि. अकोला
- भ्र. 7507094882
- ईमेल : milindhiwarale@yahoo.com