दोस्तांनो, आता अनलॉकच्या प्रक्रियेत काही नियम आणि अटींसह पर्यटनाला हळुहळू चालना दिली जात आहे. मुख्यत्वे आजकाल पर्यटनाचं महत्त्व बरंच वाढलं असलं तरी प्रवास, निवास तसंच अन्य बाबींवरील वाढत्या खर्चामुळे इच्छा असूनही भटकंतीचा विचार दूर ठेवावा लागतो. परंतु कमी खर्चातही तुम्ही मस्त भटकंती करू शकता. कशी ते जाणून घेऊ..
भटकंतीसाठी दर महिन्याला थोडे थोडे पैसे बाजूला ठेवा. यातून तुम्ही पर्यटनासाठी बरीच तजवीज करू शकाल. या कामी बँकेत वेगळं खातंही उघडू शकता. तुम्हाला फिरायला आवडत असेल तर याच पैशातून वीकेंडला फिरू शकता. ट्रिपचं नियोजन स्वत: करा. प्रत्येक गोष्ट बजेटमध्ये कशी बसवता येईल ते बघा. बजेटमुळे एखाद्या म्युझियममध्ये जाता येणार नाही किंवा आवडीच्या हॉटेलमध्ये राहता येणार नाही, हे गृहीत धरा. तुमच्याकडे ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड किंवा कॅशबॅक कार्ड असेल तर ते बाहेर काढा. असं कोणतंही कार्ड नसेल आणि तुम्ही सहा महिन्यांनी फिरायला जाणार असाल तर कार्डसाठी अर्ज करू शकता. तुमच्याकडच्या कार्डचा योग्य वापर करा. राहण्यासाठी हॉटेल निवडताना खर्च कमी करण्यावर भर द्या. अपार्टमेंट किंवा इतर पर्यायांचा विचार करू शकता. राहण्यावर जास्त पैसे खर्च होणार नाहीत याकडे लक्ष द्या.
Related Stories
November 20, 2023
October 27, 2023
October 12, 2023