आता हिवाळ्याचे अखेरचे काही दिवस शिल्लक आहेत. लवकरच उकाडा जाणवू लागेल. ऋतूबदलाच्या या काळात बरेच विकार बळावतात. पण अशाप्रकारे विकार कशामुळे बळावतात हे मात्र समजत नाही. पाहू या याविषयीची काही कारणं.
ऋतूबदलामुळे वातावरणात बदल होतो. त्यामुळे फ्लूच्या जंतूंना पूरक परिस्थिती निर्माण होते. शारीरिकदृष्ट्या संवेदनशील व्यक्तींना याची लवकर बाधा होते. शरीराने वातावरणातील बदल स्वीकारले नाहीत तर फ्लू, बॅक्टेरियांमुळे होणारा जंतूसंसर्ग आणि विषाणूंची बाधा होऊ शकते. थंडीच्या काळात लोक घरात राहणं पसंत करतात. बाहेरच्या ताज्या हवेशी फारसा संपर्क न झाल्याने जंतूसंसर्ग होण्याचं प्रमाण बरंच कमी असतं. थंडीत बंदस्त होऊन घरात पडून राहणं अनेकांना योग्य वाटतं. दुसरीकडे उन्हाळ्याची सुरूवात झाल्यानंतर घराबाहेर पडण्याचं प्रमाणही वाढू लागतं. घराबाहेर पडल्यानंतर बाहेरच्या हवेशी संपर्क येतो. जंतूंचा संपर्क होतो आणि अँलर्जीचं प्रमाण वाढू लागतं. हवेतले प्रदुषत कण अँलर्जीला कारणीभूत ठरतात. यामुळे श्वसनाशी संबंधित विकार तसंच दम्याच्या प्रमाणात वाढ होते. या काळात डिहायड्रेशन, डोकेदुखी, उष्माघात यांसारख्या समस्यांही वाढतात. प्रदुषित कण हे यामागचं महत्त्वाचं कारण मानलं जातं पण याचं खापर बदलत्या तापमानावर फोडलं जातं.
Related Stories
November 20, 2023
October 27, 2023
October 12, 2023