कधी काळी प्रौढ वयामध्ये मागे लागणारा उच्च रक्तदाबाचा धोका आता अगदी तरुण वयापासून जाणवू लागला आहे. हा त्रास अनेक समस्यांचं कारण ठरतो आहे. असं असलं तरी अनेकजण उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शनला फारसं गांभीर्याने घेत नाही. पण रक्तदाबावर परिणाम करणार्या दैनंदिन आयुष्यातल्या काही चुका टाळल्या तर हा त्रास नियंत्रणात राहणं अजिबात अवघड नाही. याविषयी..
चायनीज पदार्थांचं अतिसेवन आरोग्याला मारक ठरतं. या पदार्थांमध्ये मीठाचं प्रमाण बरंच जास्त असतं. सोया सॉस, गार्लिक सॉस, बीन्स सॉस यासारख्या सॉसमध्ये सोडियमचं प्रमाण बरंच जास्त असतं. जीमिंग किंवा व्यायामाच्या चुकीच्या पद्धती आणि प्रथिनयुक्त आहाराचं अतिसेवन यामुळे शरीरावर ताण येतो. त्यामुळे शरीराचा आतला आवाज ऐकून वास्तववादी आहार उद्दिष्टांवर भर द्या. दुपारची झोप कतीही आवडीची असली तरी ती टाळणंच योग्य. दुपारी झोपल्यामुळे उच्च रक्तदाब होण्याची शक्यता अनेकपटींनी वाढते. आहारात इटालियन चीजचा वापर करावा. यामुळे रक्तदाब वाढत नाही. उलट तो कमी होण्यास मदत होते. अशी काही पथ्यं आपल्याला या धोक्यापासून दूर ठेवू शकतात.
Related Stories
September 3, 2024