साहित्य: जाड रवा, थोडेसे आंबट ताक, मीठ चवीनुसार, थोडेसे जिरे ठेचलेले,बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या ,बारीक चिरलेला कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, आलेपेस्ट ,खायचा सोडा आणि तेल.
आप्पे बनविण्याची कृती: सर्वात आधी रवा आणि ताक साधारणत: एक तासभर भिजवून ठेवा. या मिर्शणामध्ये नंतर हिरव्या मिरच्या ,जिरे,कढीपत्ता, आलेपेस्ट आणि कांदा टाकून चवीप्रमाणे मीठ आणि चिमुटभर खायचा सोडा घालून मिर्शण एकजीव करून घावे. हे झाल्यानंतर आप्पेपात्र गॅसवर गरम करण्यासाठी ठेवावे . अप्पेपात्रातील प्रत्येक अर्धगोलात तेल लावून त्यात भिजवलेले पिठ घालावे. वरून झाकण ठेवून मंद आचेवर ४ ते ५ मिनीटे एक बाजू खरपूस भाजून घ्यावी. काटेरी चमच्या ने पलटून दुसरी बाजूपण थोडे तेल घालून खरपूस करून घ्यावी. नारळाच्या चटणीबरोबर गरमच सर्व्ह करावे.
Contents
hide