दिवाळी आली. दिवाळी गेली. मग झाले तुळशीचे लग्न.त्यानंतर सुरू झाली लगीन घाई. काही लोकांनी आपल्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न आगदी झगमगाटात केले.करत आहेत. तर काहींनी साध्या पद्धतीने.लग्नाला हजर असलेले पाहुणे मंडळी,मित्रमंडळी मात्र चर्चा या दोन्ही प्रकारच्या लग्नाची करत राहतात व लग्नाच्या वेळी करतात.
लग्न कितीही डोळ्याचे पारणे फेडणारं राहू द्या.त्यात काहीतरी कमीपणा दाखवणारे हजर असतातच.ते कसे असतात तुम्हाला सांगतोय.एका गावात एका श्रीमंत माणसाने एक सुंदर गाय विकत आणली.गाय जेवढी सुंदर होती त्यापेक्षा त्याची किंमत जास्त होती.त्या श्रीमंत माणसाने गाय गावात आणल्यानंतर एका मंदिरासमोर बांधली.गाईस चारा टाकला.व त्याच्या मुलाला सांगितलं,”बाळा गावात जा आणि सर्वांना सांग आम्ही एक गाय विकत आणलोत तुम्ही पाहून सांगा की आणलेल्या गाईत कांही आयेब आहेत का?गाय आयबी आहे का?”
बापाची आज्ञा माणुन मुलगा गावात जावून प्रत्येक घराला सांगितलं,” आम्ही नविन गाय आणलोत तुमी गाय पहाण्यासाठी या. “गावातील सर्वजण लहानथोर गाई भोवती जमा झाले व गाईची व मालकाची स्तुती करु लागले;पण गावातील एक वयोवृध्द जो जणावराचा जाणाकार होता तो तेथे आलाच नाही.गावातील जमलेल्या लोकांनी आरे फलांना बिस्ताना आलाच नाही की अशी चर्चा झडू लागली. शेवटी त्या म्हाताऱ्या माणसाला तेथे बोलावून आणलं.काठी टेकत टेकत तो म्हातारा तेथे आला. एक डोळा बंद करून गाईकडे पाहिला.गाईभोवती एक चक्कर मारली व काही न बोलता तो त्याच्या घराकडे चालू लागला त्याला त्या गायीत असं नविन काही दिसलंच नाही.तेव्हा गाईच्या मालकाने त्याला विचारले, “काय हो आजोबा गाय चांगली आहे का नाव्ह?”त्यावर आजोबा म्हणाले,”काय चांगली की काय वाईट की बा आरं थोडं गायीच्या शेपटीखाली बगा की तेथे एक गेचूड बसलाय की. उगीच मला विचारालाव गाय कसी हाय म्हणून.”थोडक्यात सांगायचं म्हणजे तुम्ही कितीही चांगलं करा नाव ठेवणारे असतातच. चुका काढणाऱ्याला फक्त चूकाच दिसतात.
असंच काल मी लग्नासाठी परळी वैजनाथला गेलो होतो. लग्न श्री वैजनाथाच्या मंदिराजवळचं होतं.जाताना माझ्या मित्राच्या कारमध्ये गेलो होतो.नवरदेव उदगीरचं होतं. तर नवरी बीड जिल्ह्यातील.दोन्ही कुटूम्ब आगदी उच्चशिक्षित होते. तरीपण लग्नात फारसं बडेजावपणा केले नाही.आगदी सुंदर कार्यक्रम झालं. मोठेपणाचं लवलेशही नव्हतं. होतं तेथे होतं फक्त साधेपणा. लग्नं आगदी वेळेवर लावलं गेलं. सर्व कार्यक्रम वेळेवर पार पडले. पाहुणे मंडळी,मित्रमंडळी याचं जेवण झालं. आता सर्वांची घराकडे निघण्याची लगबग सुरु झाली. नवरदेव नवरीची गाडीही सजवण्यासाठी तयार होती.
आम्ही जाताना कारने गेलो होतो ;पण येताना महाराष्ट्र शासनाच्या एसटीने प्रवास करावयाचा होता.मित्राने आम्हाला एसटी स्टॅण्डवर कारमधून आणुन सोडले. नांदेड गाडीची वाट पहात थांबलो.गाडी फ्लॅटफॉर्म सोडून बाजूला थांबली होती.मी थांबलेली गाडी पाहून लगबगीने गाडीकडे गेलो मध्ये गाडीचा चालक होता.मी विचारलो,साहेब गाडी नांदेडला चालली का?” चालक साहेब म्हणाले, “होय जाणार आहे पण आता नाही.” मी म्हणालो,आत मध्ये बसू का?त्याचं उत्तर नाही असं आलं.
मी उगीच त्या चालकाच्या चेहऱ्याकडे केविलवाणे म्हणा की लाचारपणे म्हणा पहात थांबलो.माझ्या नजरेत आशा होती.मला वाटत होतं गाडी निघेल तेव्हा निघेल;पण गाडीत बसा म्हणतील.असे माझ्या मनाला पुन्हा पुन्हा वाटत होतं. शेवटी चालक म्हणाला,”कुंठं जायचं?डायरेक्ट नांदेड का?” मी म्हणालो,”होय साहेब ,नांदेड.” ”मग बसा” साहेब म्हणाले.गाडीत बसलो. वाहकाच्या मागील एक सिट सोडून बसलो.गाडी जेथे लागते तेथे येवून थांबली. वाहक म्हणाला , गंगाखेड,पालम, लोहा, सोनखेड ,नांदेडवाले बसा.” गाड़ी खचाखच भरली. वाहकाने घंटी दिली व गाडीत जीव आला. गाडी थरथर कापल्यासारखी केली.एकदा चालकाने वाहकाकडे पाहिलं व गाडी जाग्यावरून हालली. रस्त्याला लागली.आता गाडीने वेग घेतला होता.वाहक तिकीट तिकीट म्हणून पुढून मागपर्यंत फिरुन त्याच्या सिटजवळ आला.त्याच्या सिटवर एक मध्यम वयाची बाई बसली होती.वाहक म्हणाला,”ए मावशी ऊठ बाजूला हो.”त्यावर बाई म्हणाली,” आव बस्सा की साहेब मागं पुढं सरकून”वाहक म्हणाला,”उठा उठा बाजूला व्हा”बाई थोडं रागानेच त्याच्याकडे पहात उठून उभी राहिली व थोडया झटक्याने बाजूला झाली.
गाडी आता गंगाखेड गाठण्याच्या इर्षेन पळत होती. गंगाखेड आलं.चार एक माणसं उतरली व जवळपास तेवढीच गाडीत चढली.पुन्हा गाडी रस्त्याला लागली.तिस पस्तीचा तरुण असेल तो दारालाच थांबला होता.मोठ्या आशाळभूत नजरेने तो सिटवर बसलेल्यांकडे पहात होता. कोणीतरी सरकून त्याला जागा देतील असे त्याला वाटत असावे;पण तसं काही घडणार नव्हतंच.मला उगीच वाटून गेलं काळजाला स्पर्श करून गेलं जीवन ही असंच असतय खुळ्या आशेवर जगायच.
सिट क्रमांक आठ व नऊ हे वरिष्ट नागरिकांसाठी आरक्षित होते. असे तिथं लिहिलेलं होतं.त्या सिटवर विस पंचवीस वयाचे दोन पोट्टे मोबाईल पहात बसले होते.ते त्यांच्याचं जगात हरवलेले होते.त्याच्या जवळ अंदाजे सत्तर वर्षाचे आजोबा थांबले होते ;पण त्या पोट्टयांना त्या आजोबाचं काहीच देणंघेणं नव्हतच.खरं तर त्यावेळी वाहकांने त्या पोट्टयांना उठवून आजोबानां बसवायला पाहिजे;पण वाहक नेहमीच अशा गोष्टी टाळत असावेत. किंवा ऊगीच ब्याद ,लचांड कशाला लावून घ्यायचे म्हणून तो गप्प बसत असावा.
गाडी आपल्या वेगाने पळत होती.दोन्ही बाजूच्या सिटमधील मोकळ्या जागेत माणसं थांबलेली होती.गाडी पालमला थांबली.एक दोन माणसं गाडीत चढली.त्या चढणाऱ्यामध्ये एक तरुण होता.तो मागे थांबलेल्या एका पन्नासी गाठलेल्या माणसास म्हणाला,”आहो काका मागे जागा आहे का थांबवण्यास ? ” तो माणुस वसकन त्याला म्हणाला,”म्या काय तूझा नोकर आहो होय रं .मला का विचारलास ? मला माहित नाही.मला तू आदेश देतूस का?”तो तरुण आगदी गप्प थांबला. तो तरुण असुनही नम्र होता.एकही शब्द तो बोलला नाही.खरं तो दिसायाला आगदी धट्टा कट्टा होता.आहो तरी पण तो किती प्रेमाने त्याला विचारलं होतं. कमी वयात त्यात माणुसकी दिसून आली.तो पन्नाशीचा माणुस तिरसीखोरपणे त्याला तुसडेपणाने ऊतर देवून त्याच्यातील माणुसकी दाखवली?माणुसकीचं दर्शन घडवलय बिचाऱ्याने ?
परळी ते नांदेड तीन सवातीन तासचं प्रवास;पण गाडीतील सहप्रवासी सर्व सारखेच नव्हते व नसतात ही. येथे कोणी गप्पा मारत होते.कोणी थोडंसं सरकून कोणाला तरी बसण्यासाठी जागा करून देत होते.कोणी दयाळू होते.कोणी मायाळू होते.कोणी हसत होते.कोणी हसवत होते पण गाडीत दोन चार असे होते की त्यांना दुसऱ्याचं काहीही देणंघेणं नव्हतचं.त्यांच्याकडे फक्त स्वतःचाच अहमपणा होता का आणखी काय होता हे सांगता येत नाही.
दोन तीन तासाच्या प्रवासात बरेच प्रवासी गाडीत होते.काही चढले काही उतरले जीवनाचा प्रवास ही असाच असतो नाही का? कोणी जीवनाच्या गाडीत चढतो कोणी उतरतो. प्रत्येकाचं चढण्या उतरण्याचं स्टेशन वेगळं असते एवढचं. जीवनाच्या प्रवासात कोणी सुखाचा वाटेकरी होतो,कोणी दुःखाचा वाटेकरी होतो तर कोणी गाव जलो हनुमान बहार म्हणुन दूरून तमाशा पहात असतो.कोणी तमाशा करतो तर कोणी तमाशा घडवून आणतो.जीवनात कोणी आग लावतो तर कोणी ती आग विझवणाराही भेटतो.
मला येवढचं वाटतंय की आपण जन्मल्याबरोबर रडतो किंवा रडत रडत जन्मतो मग आता स्वतः हसत हसत व दुसऱ्यांना हसवत हसवत मरण आलं पाहिजे अशी अपेक्षा करू या..!
- -राठोड मोतीराम रुपसिंग
- नांदेड _६
- ९९२२६५२४०७.
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–