- हक्काच्या छप्परासाठी
- काल निघून गेला जीव
- निगरगट्ट प्रशासनाला
- त्याची आली नाही किव
- उपोषण कर्त्याचा मृत्यू
- जिल्हा हादरून गेला बीड
- कुठवर ही जीवंत असेल
- लागून राहिलेली किड
- दप्तर दिरंगाईचा फटका
- जनसामान्यांनाच बसतो
- हेकेखोर राजवटीला
- कसलाच कळवळा नसतो
- गार थंडीच्या कडाक्यात
- कुटूंबाची झाली वाताहत
- कुटूंब पडले उघड्यावर
- मरणानं केला मोठा घात
- छोट्या मोठ्या कामासाठी
- आडमुठेपणाचा होतो कळस
- गोरगरिबांच्या जीवनात
- कधी फुलेल केशरी पळस
- पूर्वी होता तसाच दिसतो
- गोरगरीब जनतेचा आज
- काही केल्या उतरत नाही
- ढुंगणाखालील खुर्चीचा माज
- -पी के पवार
- सोनाळा बुलढाणा
- ९४२१४९०७३१
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–