- आयुष्याच्या ताव्यावरती
- संसाराची पोळी भाजता भाजता
- हाताला किती चटके बसले?
- आईने कधी मोजलेच नाही
- सा-यांचे करता करता
- मोठ्यांचा मान राखण्यासाठी
- कितीदा कंबर वाकले?
- आईने कधी मोजलेच नाही
- बाळाला झोके देता देता
- आपली झोप मोडून
- बाळासाठी किती रात्र जागले?
- आईने कधी मोजलेच नाही
- जरा चुकले की सर्वांची बोलणी
- गुपचूप वोटीच्या रुपात घेत
- काळजाला किती घाव पडले?
- आईने कधी मोजलेच नाही
- याच्यासाठी, त्याच्यासाठी
- आणखीही कुणासाठी जगता जगता
- स्वतःसाठी अशी किती जगले?
- आईने कधी मोजलेच नाही
- पाखरे दूर गेल्यावरती
- डोळ्यात महापूर साठवून
- प्रतिक्षेचे किती सूर निसटले?
- आईने कधी मोजलेच नाही
- अनेक पात्र रंगवता रंगवता
- सुख दु:खाच्या वजाबाकीत
- किती सरले नि किती उरले?
- आईने कधी मोजलेच नाही
- शब्दस्पर्शी-सुनील शिरपुरे
- कमळवेल्ली, यवतमाळ
- भ्रमणध्वनी-७०५७१८५४७९
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–