अंधार नष्ट करण्याचे धैर्य एका पणती असते ,तिची छोटीशी वात
अंधाराला पळून लावते .तसेच मानवी मनाला ती उर्जामय करते..समतेचा प्रज्ञामय प्रकाश
जर माणसाला त्यांच्या विचारातुन सत्य शोधण्याचा स्त्रोत मिळाला तर समाजातील अनिष्ट रूढीवर मात करण्याची शक्ती अदृश्य मनामध्ये येते आणि आलेली आहे. भविष्य ,वर्तमानात सुध्दा तेवढीच प्रखरतेने वातीच्या मशाली पेटत राहील हे तेवढ्याच गतीने आकाशापरी वैचारिक ,बलदायी ,क्रांतिकारक ,सत्य आहे ,जसा प्रकाश आपले कार्य निरंतर चालू ठेवत असते अगदी तसेच दिव्यात वात तेल आहे तो पर्यंत तो दिवा काळोखाशी संघर्ष करीत असतो कधी कधी त्याच्या वाटेवर वादळी वारे ही येतात तेव्हा ती वात क्षणभर खाली जाते पण निश्चलतेच्या अविरत संघर्षाशी लढत आलेली ती छोटीशी वात उर्जापूंज होते पण विझत नाही आणि आपल्या दृढगमा अचिश्मतीच्या दूरदृष्टीने जगाला पाहत असते म्हणून प्रकाश कधीही हारत नाही. रात्रीला बाजुला सारून नवा उजेडसत्व उर्जामय निसर्गाचे सत्य चेतना रूप घेऊन प्रत्येक मनावर उजेड राज्य करीत असतो आपल्या मनातील उजेड असाच प्रकाशमय होऊन माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे हीच उजेडाची चिरतंर शिकवण आहे.एकदुसर् यांच्या दुखां मध्ये जाऊन दुसर् याचे दुःख कमी करणे ही भारतीय परंपरा आहे.म्हणुन आनंदात ही तेवढ्याच गतीशीलतेने मनोमीलनाने सहभागी होतात.भारतात अंसख्य जाती आहेत ,तेवढ्याच बोली भाषा आहेत .वेगवेगळ्या वेषभूषा असुनही भारत एका प्रकाशाच्या प्रज्ञामय धरोहर मध्ये प्रकाशयम झाला आहे आणि तो दिवा आहे भारतीय संविधानाचा अश्या स्वातंत्र्य ,मनाच्या दिव्यातुन वैभवाचा प्रकाश आपल्या जीवनात पडो अशी समता बंधुतेच्या वातीतुन आपणास सुखेच्छा मिळो ,, सौर्वभौम तेची रास आपल्या विचारावर पडो, भारताच्या तिरंग्या परी आपली उत्तराउत्तर प्रगती हो, अशोक चक्राच्या गती समान आपले ज्ञान वैभव वाढो भारतीय भुमीत असे. दिवे लावा असंख्य प्रकाशमय वातीच्या शुभेच्छा..
असा दिपत्व आपणास लाभो..सर्वाचे मंगल ही मंगल हो.. सर्वांना शुभेच्छा..
सुनीता इंगळे
Related Stories
September 3, 2024