- गौरव प्रकाशन वृत्त संकलन
अमरावती (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केलेला ‘चुनावी जुमला’ आहे. सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्रासह मुंबईच्या तोंडाला पाने पुसली असून केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या हाती मात्र रिकामा खोकाच देण्यात आला अशी टीका केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या बजेटवर आमदार देवेंद्र भुयार यांनी केली आहे.
आज देशातील सर्वात जास्त लोकांना रोजगार देणाऱ्या कृषी क्षेत्राला आणि शेतकऱ्यांना अर्थसंकल्पातून काही दिलासा मिळाला नाही. ना पीक कर्जाच्या व्याजदरात काही सवलत मिळाली. ना किमान आधारभूत किंमतीबद्दल काही घोषणा झाली, ना खते बियाण्यांवरील जीएसटी कमी केला. ना शेतकऱ्यांचे उत्त्पन्न दुप्पट करण्याचा काही फॉर्म्युला अर्थमंत्र्यांनी दिला. अन्न, रसायन मुक्त नैसर्गिक शेती, किसान ड्रोन, शेतकऱ्यांना डिजीटल आणि हायटेक सेवा अशा आकर्षक शब्दांच्या पलिकडे या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या पदरी काही पडले नाही.
यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकरी बेरोजगार युवकांसाठी कोणतीही ठोस तरतूद करण्यात आलेली नसल्यामुळे शेतकरी शेतमजूर युवकांचा भ्रमनिराश करणारा अर्थसंकल्प ठरला आहे.
● हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–