- जल चंचल चंचल
- बाष्प होई उन्हासवे
- थंड गारवा लागता
- वीज खेळे ढगासवे
- वारा खेळतो कबड्डी
- थेंब शिपिंत अंगणी
- मातीसवे मिसळता
- गंध सुहास चंदनी
- धारा कोसळे पहाडी
- जल होई शुभ्र दूध
- थेंब तुषार फुलात
- मोती सुगंधित ऊद
- थेंब नाचे छतावर
- तडतड बाजा वाजे
- धार पन्हाळ कोसळे
- पिका मिळे पाणी ताजे
- ओढा ओहळ पाझर
- खळखळ पाणी पळे
- नाला वगळ त्या नदी
- सोने पिकविते मळे
- तळे विहीर धरण
- वीज होत पाणी पळे
- स्पर्श बाबासाहेबांच्या
- चवदार होई तळे
- सात समुद्री त्रिभुज
- हिम हिमालय बर्फ
- लाट चंचल चंचला
- जलसृष्ठी मीठ अर्क
- -मुबारक उमराणी
- सांगली
- ९७६६०८१०९७.