Wednesday, November 5

आंदोलनादरम्यान होणारी वाहतूक कोंडी चिंताजनक!

T

आंदोलना  दरम्यान “रस्ता रोको” (नाकाबंदी) आंदोलन चुकीचे आहे की नाही हे एखाद्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतो. काहींचा असा विश्वास आहे की यामुळे सामान्य लोकांना गैरसोय आणि त्रास होतो, तर काहींचा असा युक्तिवाद आहे की ते एखाद्याच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी एक आवश्यक आणि प्रभावी माध्यम आहे. आंदोलनादरम्यान हिंसा  होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी  रस्ता रोको आंदोलने करू नये.

अनेक आंदोलनाला हिंसेचे स्वरूप मिळाले.

रस्ता रोको मुळे अनेकांचे प्राण गेले. आंदोलन कोणत्याही प्रकारचे का असेना  त्या आंदोलकांना रस्त्याची नाकाबंदी करू देऊ नये.सुरक्षित प्रवास हा जनतेचा मूलभूत अधिकार आहे.रस्तावर जनतेची कोंडी होत असेल तर हा प्रकार मानवी अधिकाराचे उल्लंघन करणारा आहे.

आपल्या मागण्या प्रभावीपणे  शासनापर्यंत  मांडण्यासाठी वापरली आंदोलक  रस्ता रोको आंदोलन करतात. सरकारचे  लक्ष वेधून घेण्याचा हा एक प्रकार आहे.  ही  एक आंदोलनाची रणनीती आहे. परंतु रस्ता रोको मुळे जनतेची गैरसोय होत असते आणि  हा  वादाचा विषय बनू शकतो. काहींचा असा विश्वास आहे की रस्ता रोको आंदोलने टाळल्याने चळवळीची विश्वासार्हता टिकून राहते, तर काहींचा असा युक्तिवाद आहे की ही चळवळ अधिक मजबूत आणि प्रभावी बनवण्याचा एक मार्ग आहे. आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणजे आंदोलन करणे, रस्ता रोको करणे, मोर्चा काढणे.ही एक प्रभावी पद्धत असू शकते.कोणत्याही चळवळीला लक्ष वेधून घेण्यास आणि तिच्या मागण्या प्रभावीपणे मांडण्यास मदत करू शकते.

सरकारवर दबाव आणण्याचा हा एक मार्ग असू शकतो.

आंदोलन करणे मोर्चा काढणेहा संविधानिक अधिकार असला तरी  आंदोलनादरम्यान होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे सर्व सामान्य जनतेला त्याचा नाहक त्रास होतो. एका विशिष्ट वेळेत प्रत्येकाला त्यांच्या ठिकाणी त्यांना पोहोचायचे असते. वेगवेगळ्या कारणासाठी  नागरिक रस्त्याने ये -जा करतात. आंदोलक जर रस्त्यावर बसले त्यांनी वाहतुकीची कोंडी केली तर त्याचा फटका जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना  बसतो. ॲम्बुलन्स, वैद्यकीय कारणांसाठी जाणारे प्रवाशी वाहतूक कोंडीमुळे अडकून पडतात.म्हणून आंदोलनादरम्यान वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता आंदोलनकर्त्यांनी व सरकारने घ्यायला पाहिजे. कारण वाहतूक कोंडीचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत असतो.आंदोलनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे सामान्य जनतेला, विशेषतः प्रवाशांना आणि व्यापाऱ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो. केवळ सामान्य जनताच नव्हे तर अनेक रुग्णांना देखील यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो.

शेतकरी आंदोलनामुळे वर्धा मार्गावर वाहतूक कोंडी झाली. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला. केवळ सामान्य जनताच नव्हे तर अनेक रुग्णांना देखील यामुळे मनस्ताप सहन करावा लागला. या मार्गावर असलेल्या रुग्णालयातील उपचारांसाठी जाणारे रुग्ण वाहतूक कोंडीतच अडकले. त्यात काही कॅन्सरग्रस्तांचा देखील समावेश होता. मध्यरात्रीच्या सुमारास देखील अनेक रुग्णवाहिका कोंडीत अडकल्याचे दिसून आले होते. शेतकऱ्यांनी त्यांच्या मागणीसाठी आंदोलन करावे. मात्र सर्वसामान्य जनतेला वेठीस धरू नये असा संतप्त सवाल  जनते मधून येत आहे.

नागपूरकडे येणाऱ्या व नागपुरातून बाहेर जाणाऱ्या मार्गावर अनेक रुग्णवाहिका देखील अडकल्या होत्या. त्यातील रुग्णांची या कोंडीमुळे प्रचंड हाल झाल्याचे दिसून आले. या दरम्यान अनेकांना पायपीट करावी लागली. अनेक रुग्ण. रस्त्यातच अडकले महिलांना रात्रभर रुग्णालयात राहावे लागले.

झारखंडमधील कुर्मी समुदायाने सप्टेंबर मध्ये  रेल रोको आंदोलन केले होते.या  आंदोलनामुळे १०० हून अधिक गाड्या रद्द करण्यात आल्या किंवा वळवण्यात आल्या होत्या अनुसूचित जमातीचा दर्जा आणि कुडमाळी भाषेला मान्यता देण्याची मागणी तीव्र झाली करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते.

झारखंडमधील कुर्मी समाजाचे आंदोलन  अधिक  तीव्र  झाले होते.२० सप्टेंबर २०२५  रोजी ‘रेल रोको’ आंदोलनाचा भाग म्हणून अनुसूचित जमातीच्या (कुर्मी समुदायाच्या) सदस्यांनी अनेक गाड्या विस्कळीत केल्या.ते अनुसूचित जमातीचा दर्जा आणि संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये कुडमाळी भाषेचा समावेश करण्याची मागणी करत आहेत. “रेल रोको” आंदोलनामुळे आग्नेय आणि पूर्व मध्य रेल्वेच्या अनेक विभागांमध्ये १०० हून अधिक गाड्या रद्द करण्यात आल्या, मार्ग बदलण्यात आल्या किंवा मध्यभागी थांबवण्यात आल्या, ज्यामुळे हजारो प्रवासी अडकून पडले आणि रेल्वेचे कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले होते.

रस्ता रोको आंदोलनामुळे जनतेला त्रास होतो आणि अराजकता पसरते, ज्यामुळे सामान्य जीवन आणि अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होतो. “रास्ता रोको” निषेधादरम्यान सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे किंवा हिंसाचाराचा वापर करणे कायदेशीर आणि नैतिकदृष्ट्या चुकीचे मानले जाते. तथापि, काही देशांमध्ये शांततेने रस्ते किंवा रेल्वे रोखणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अंतर्गत संरक्षित केले जाऊ शकते.ते देखील कायद्याच्या चौकटीत राहून.

प्रा डॉ सुधीर अग्रवाल

वर्धा

९५६१५९४३०६

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.