शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यासाठी डॉ. नंदकुमार राऊत अध्यक्ष, प्रा. दादासाहेब कोते उद्घाटक
गौरव प्रकाशन येवला (प्रतिनिधी ) : शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यासाठी डॉ. नंदकुमार राऊत अध्यक्ष, प्रा. दादासाहेब कोते उद्घाटकशिवाबाबा वाघ प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय पाचव्या साहित्य कलाकृती पुरस्कार सोहळ्यासाठी अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नंदकुमार राऊत यांची, तर उद्घाटकपदी ज्येष्ठ साहित्यिक व कवी प्रा. दादासाहेब कोते यांची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय वाघ आणि सचिव राजेश वाघ यांनी पत्राद्वारे दिली.येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथे दि. ४ जून २०२६ रोजी हा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. महाराष्ट्रातील कवी, लेखक आणि कथाकार यांच्या उत्कृष्ट साहित्य कलाकृतींना देण्यात येणारे पुरस्कार यापूर्वी १ मे २०२६ रोजी जाहीर करण्यात आले होते. निवड झालेल्या साहित्यि...
