Monday, March 2

Tag: #marathiarticle

माणुसकीचा ओलावा कमी झाला.!
Article

माणुसकीचा ओलावा कमी झाला.!

माणुसकीचा ओलावा कमी झाला.!बदल, आपण बरेचदा बोलुन जातो की अमका फार बदलला, तमका फार बदलला, अमका लग्नानंतर फार बदलला, माणसा माणसा मधे काळानुसार, त्या त्या वेळेनुसार बदल घडुन येतात, ऋतु बदलतात तशी काही माणसं पण बदलतात, त्यांचे स्वभाव बदलतात, गाव बदलतात, शहर बदलतात, जग बदलत चाललंय, मी बदललो असेन, तुम्ही बदलला असाल. काळानुसार लाईफ स्टाईल बदलत चाललीय. संडास ते शौचालय ते टॉयलेट ते वॉशरूम असा हा शब्दरूपी बदल अन् मोरी ते बाथरूम हा शब्दरूपी बदल नकळत घडून आला. पूर्वी मोरी वेगळी असायची अन् संडास वेगळे असायचे, आता दोघांना एकत्रित करून ते washroom झाले, केवढा हा बदल. हल्ली "संडास" शब्द उच्चारायला माणसं कचरतात, तो रांगडा शब्द वाटतो, त्या ऐवजी टॉयलेट / वॉशरूम हे सभ्य शब्द वाटतात म्हणुन त्यांची चलती जास्त आहे.शहरीकरण झाल्यानंतरचे एकंदरीत बदल आधुनिक सुख सोयी तर देतात पण एकंदरीत वाट पण लावून जातात असच म्हण...
आणि…कविता जिवंत राहिली
Article

आणि…कविता जिवंत राहिली

आणि…कविता जिवंत राहिली तो दिवस आम्हा नवरा बायकोच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस होता.ती गरोदर होती सातवा महिना सुरू होता.निर्भय तिच्या पोटात वाढत होता.माझा तीन महिन्यापासून पगार झाला नव्हता.मी कंत्राटी कामगार होतो.आणि वेळ अशी आली होती,घरातलं सगळं राशन संपलं होतं.गॅस संपून आठ दिवस झाले होते.स्टोव्ह मध्ये शिल्लक राहिलेल्या रॉकेलवर ती काटकसर करून कसातरी दोनवेळचा स्वयंपाक करत होती.टीव्ही चा रिचार्ज संपला होता.त्यामुळे टीव्ही ही बंद होता.रोजचं येणारं दूध बंद केलं होतं.घरमालक सारखा भाडे मागण्यासाठी फोन करत होता.तीन महिने मी काहीतरी करून ढकलत आणले होते.तिच्या सोनोग्राफीला आणि दवाखान्याला बराच बराच खर्च झाला होता.गावाकडे आई वडील आजी आणि बहीण असायचे.तिकडे ही लक्ष द्यावे लागायचे.दिपालीने कधीच कसला हट्ट केला नाही.उलट जितकी काटकसर करता येईल तेवढी ती करत होती.आणि माझ्यासोबत लढत होती.परंतु आजची परिस्थि...
शेवट गोड व्हावा…
Article

शेवट गोड व्हावा…

शेवट गोड व्हावा...सान्तावर भादरनार्‍यायन या कलेला किती जगवल ? खरतर अशाच बाजार बुनग्यांनीच ही कला बंद पाडली आणि अखेर संस्कृतीचा नाश केला करत आहेत. वर्षाच्या शेवटी सान्ता ही भेटतो आणि हा भारतीय कलेचा अदभुत कलाविष्कार ही आज भेटला आणि वर्षा अखेरचा दिवस ही गोड झाला.यांना आम्ही जगवायला पाहिजे होतं भरभरून द्यायला पाहिजे होतं...पन दिल नाही. हे इतिहासातली पाने आहे. ही नष्ट करण्यात धन्यता मानणारे नाकाने संस्कृती टिकविण्याच्या बाता झाडतात. ज्या काळात घड्याळाची काटे न्हवती त्या काळात घड्याळाच्या काट्याची कामे ही जीवंत माणसे अत्यंत चोख करायची, सकाळी चार पासून गावं जागवायची, जेने करून गावाचा प्रपंच गाडा व्यवस्थित चालावा.हे वाचा – Karanja Lad : आमचे लाडाचे कारंजे ....आधुनिक कारंजा महात्म्यछत्रपतींच्या शिवरायांच्या काळात ह्या जीवंत कला डबरूवाले, पांगूळ, डोंबारी, वासुदेव या आणि अशा अनंत कला अत्यं...
करजगावचे  संघर्षशील  व्यक्तिमत्व : सतीश दवणे
Article

करजगावचे संघर्षशील व्यक्तिमत्व : सतीश दवणे

करजगावचे संघर्षशील व्यक्तिमत्व : सतीश दवणे "अच्छे ने अच्छा, और बुरे ने बुरा जाना मुझे, क्योंकी जिसकी जितनी जरुरत थी, उसने उतनाही पहचाना मुझे"ओल्या रांजणाचा काठ कुंभार जितक्या सहजतेने वळवू शकतो, मातीच्या ओल्या गोळ्याला जसा आकार देवू शकतो तेवढ्याच सहजतेने परिस्थितीवर स्वामित्व ठेवून तो ती बदलू शकतो, हवी तशी अनकुल करुन घेऊ शकतो हे सर्व तो त्यांच्या सुप्त व प्रकट सामर्थ्यांच्या, चारित्र्य संपन्नतेच्या, विचाराच्या, सत्कर्माच्या आणि पुरूषार्थाच्या जोरावर साध्य करतो. त्याच्या मनात असणाऱ्या तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावर आपल्या साध्यास साध्य, सिद्ध करू शकतो. गरींबी, अवहेलना व अपमान, अवतीभवतीची स्थिती, घरच्या पिंजलेल्या भूकेभोवती पिंगा घातलेल्या यातना यातून मनात जिद्द, इच्छाशक्ती पेटून ऊठते व जीवनाचे इप्सित साध्य करण्यासाठी कष्टाची तयारी मनात ठेवून जो वाटचाल करतो तो आपल्या ध्येयसिध्दीपर्यंत पोहचतो ह...