शिक्षण: भ्रम आणि वास्तव
शिक्षण: भ्रम आणि वास्तवशिक्षण मानवाच्या जीवनाला नवा परिवर्तनशील महामार्ग दाखवणारा ऊर्जास्वल आहे. शिक्षण या तीन अक्षरापासून बनलेला हा शब्द मानवाच्या नवनिर्मितीची प्रक्रिया करतो. सुजाण व चांगला माणूस हा जगाचा महत्त्वाचा पाया आहे.आजचे शिक्षण नक्कीच्या या स्वरूपाचे आहे का..? हा प्रश्न देशातील सर्व बांधवांना पडला आहे. शिक्षणावर अनेक प्रयोग करण्याच्या नादात विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळू नये असा घाट काही वर्ग सातत्याने रचत आहेत. हे वास्तव आपण समजून घेतले पाहिजेत.शिक्षण हे सरकारची जबाबदारी आहे. पण ६२ हजार शासकीय शाळा खाजगी कंपन्याकडे हस्तांतर करण्याचा नियम सरकारने करून खाजगीकरणाच्या प्रक्रियेमध्ये सरकारी शाळेला नेऊन ठेवले आहे. शिक्षण हे सरकारची जबाबदारी आहे. ते त्यांचे संविधानिक काम आहे. पण आज शासन सरकारी क्षेत्र विकून स्वतः काहीच न करण्याचा प्रयत्न करत आहे.आज देशातील शिक्षण व्यवस्था...