Wednesday, April 22

Tag: #EarthDay #VasundharaDin #SaveEarth #PlasticPollution #TreePlantation #EnvironmentProtection #GoGreen #ClimateChange #MarathiArticle #SaveNature

आमची शक्ती-आमचा ग्रह
Article

आमची शक्ती-आमचा ग्रह

आमची शक्ती-आमचा ग्रह जागतिक वसुंधरा दिन: प्लास्टिक प्रदूषणाचा धोका आणि वृक्षारोपणाची गरज | Earth Day Specialआपण ज्या ग्रहावर जन्म घेतला तोच आपला ग्रह, आणि तो ग्रह म्हणजे पृथ्वी.म्हणजे पृथ्वी हा ग्रहच आपले निवासस्थान आहे असे आपण हक्काने म्हणू शकतो.आपण ज्या घरी राहतो ते घर आपण जर स्वच्छ ठेवले नाही तर त्याचे काय परिणाम होतात हे सूज्ञास सांगणे न लगे. तदवतच आपण ज्या जागेवर घर करुन राहतो त्यालगतचेही घर स्वच्छ टापटीप असावे नव्हे तर संपूर्ण परिसरच टापटीप म्हणजे स्वच्छ असावा,अगदी प्रदुषणमुक्त असावा असे प्रत्येकास वाटावयास पाहिजे. आपल्या घराभोवताल हिरवळ असावी जेणेकरुन स्वच्छ प्राणवायु आपल्या नासिकेत प्रवेश करु शकेल. झाडे किंवा वनस्पतीच्या प्रत्येक प्रजाती ह्या जैवसाखळीकरिता आवश्यक घटक आहेत.त्या तर आपण जपल्याच पाहिजेत. ते आपले प्रथम कर्तव्यच ठरते.पर्यावरणाचा समतोल साधण्यास वृक्षारोपनाशिवा...