‘अर्ल डिक्सन’ चा आज जन्मदिवस…
आज तुम्हाला ‘नाईलाजापोटी’ लागलेल्या एका रंजक शोधाची गोष्ट सांगतोय.‘अर्ल डिक्सन’ नावाचा एक सामान्य चाकरमानी तरुण ‘जॉन्सन ॲंड जॉन्सन’ या बहुराष्ट्रीय कंपनीत इमानेइतबारे काम करत होता.अगदी आपल्याकडं जसं ‘चाणाक्ष-कार्यतत्पर-गृहकर्तव्यदक्ष’ वगैरे निकष लावून वधुपरिक्षा घेतात तशी परिक्षा घेत याच दरम्यान त्याचं ‘जोसेफिन’नामक तरुणीशी लग्नही झालं.पहिले काही गोड गुलाबी प्रेमळ दिवस पार पडले. दोघांच्या छानपैकी ताराही जुळल्या. सगळं काही स्वप्नवत चाललं होतं पण एक समस्या मात्र होती. समस्या फार मोठी होती असं नव्हे, पण ती रोजचीच झाल्यानं ‘डोकेदुखी’ बनली होती. जोसेफिन स्वयंपाकघरात गेली रे गेली की तिला जखम झालीच समजा.टोमॅटो कापला लागला चाकू, दार बंद करायला गेली लागला खिळा, दुध गरम करायला गेली बसला चटका. जोसेफिन प्रेमळ असली तरी अंमळ वेंधळी होती.नोकरीसोबतच डिक्सनला घरात जोसेफिनच्या जखमा ध...





