Tuesday, November 4

Tag: Amravati

यशोगाथा तिच्या संघर्षाची
Story

यशोगाथा तिच्या संघर्षाची

यशोगाथा तिच्या संघर्षाचीपाचवीला असल्यापासून ती कष्टाशी भिडत राहिलेली.तिच्या आजी आजोबांसोबत भाजीपाला विकता विकता एम. कॉम. पर्यंत शिक्षण तिने घेतलं.आयुष्याच्या त्याच वळणावर तिचं लग्न माझ्यासारख्या फाटक्या माणसासोबत झालं.त्यावेळी मी वॉचमन होतो.आमचं लग्न झालं खरं परंतु एकमेकांच्या संघर्षाला सोबत घेऊनच आम्ही बोहल्यावर उभे राहिलो. आमच्या दोघांच्या मध्ये असणारा अंतरपाट आजही आठवतो मला.त्या पांढऱ्या वस्त्रावर त्याक्षणाला कदाचित आमच्या दोघांच्या आयुष्याचं ध्येय एकत्र येऊन नटलेलं असावं.लग्नानंतर तिचं शिक्षण पाहता मी तिला अगदी दुसऱ्या दिवशी म्हणालो सुध्दा, “ दिपाली एम. कॉम.झालेलं आहे. घरात बसून चालणार नाही.पुढं ही शिक आणि नोकरी ही कर.मी सोबत राहीन.” त्यावेळी तिने मला उत्तर दिलेलं. ती म्हणाली होती, “ आयुष्यात नोकरी करायला मला कधीच जमणार नाही.घर, संसार या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून मला ते शक्य ही ह...
नगाराभवन : मनुवाद्यांची विरासत.!
Article

नगाराभवन : मनुवाद्यांची विरासत.!

नगाराभवन : मनुवाद्यांची विरासत.!'बंजारा विरासत वस्तुसंग्रहालया'चे उद्घाटन झाले. भारताच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वोच्च पदावर असलेल्या बड्या मंडळींच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला. या समारंभाला येणाऱ्या पाहुण्यांचे राजकीय वजन आणि वलय पाहता गर्दी जमविणे आवश्यकच होते. त्यासाठी तांड्यांना लक्ष्य केले गेले. तांडे हे गर्दीचे एकमेव स्रोत होते. कार्यकर्ते जिद्दीला पेटले होते. नेत्याच्या प्रतिष्ठेचा आणि राजकीय भवितव्याचा प्रश्न होता. त्याला गर्दीनेच उत्तर देता येणार होते. त्यामुळे कार्यकर्ते गर्दीसाठी आसूसले होते. रात्रंदिवस एक करून तांडे पालथे घालत होते. एकतर सोयाबीन काढण्यासाठी तांड्यात धावधूप सुरू होती आणि त्याचवेळी नगाराभवनचाही धामधूम सुरू होता. तांड्यांकडे वेळ नव्हता. उन्हापावसात राबराब राबून काळेठिक्कर पडलेल्या त्या थकल्याभागल्या लोकांपुढे सुंदर सुंदर स्वप्ने अंथरली गेली. पोह...
आणि…कविता जिवंत राहिली
Article

आणि…कविता जिवंत राहिली

आणि…कविता जिवंत राहिली तो दिवस आम्हा नवरा बायकोच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस होता.ती गरोदर होती सातवा महिना सुरू होता.निर्भय तिच्या पोटात वाढत होता.माझा तीन महिन्यापासून पगार झाला नव्हता.मी कंत्राटी कामगार होतो.आणि वेळ अशी आली होती,घरातलं सगळं राशन संपलं होतं.गॅस संपून आठ दिवस झाले होते.स्टोव्ह मध्ये शिल्लक राहिलेल्या रॉकेलवर ती काटकसर करून कसातरी दोनवेळचा स्वयंपाक करत होती.टीव्ही चा रिचार्ज संपला होता.त्यामुळे टीव्ही ही बंद होता.रोजचं येणारं दूध बंद केलं होतं.घरमालक सारखा भाडे मागण्यासाठी फोन करत होता.तीन महिने मी काहीतरी करून ढकलत आणले होते.तिच्या सोनोग्राफीला आणि दवाखान्याला बराच बराच खर्च झाला होता.गावाकडे आई वडील आजी आणि बहीण असायचे.तिकडे ही लक्ष द्यावे लागायचे.दिपालीने कधीच कसला हट्ट केला नाही.उलट जितकी काटकसर करता येईल तेवढी ती करत होती.आणि माझ्यासोबत लढत होती.परंतु आजची परिस्थि...
झाकलेल्या गोष्टीतील कुतूहल.!
Article

झाकलेल्या गोष्टीतील कुतूहल.!

झाकलेल्या गोष्टीतील कुतूहल...     आपली भारतीय संस्कृती अतिशय उत्तम आहे.. आहार ,सण यामधे प्रचंड वैविध्य आहे.. आपलं शास्त्र उत्तम आहे पण प्रचंड प्रमाणात अज्ञानही आहे .. प्रचंड प्रमाणात लोक  संस्कृती , संस्कार , लोक काय म्हणतील यात नको तितके जखडले गेल्याने हव्या असलेल्या आणि आयुष्यातील महत्वाच्या गोष्टीवर आपण भाष्य करत नाही.. यात अनेक उच्चशिक्षीत मंडळीही आहेत..जे झाकुन ठेवायचय ते झाकायचच आहे पण ते वस्त्रानी ..  विचारांनी ते उघडं करायलाच हवं हा विचारच आपल्या मानसिकतेत डोकावत नाही .. मी लैगिकतेवर काम करत असताना किवा लिहीत असताना .. काउन्सिलींग करत असताना ही गोष्ट इतकी प्रकर्षाने जाणवते की असं वाटतं की पुढील हजारो वर्षे या मानसिकतेत बदल व्हायचा नाही.. कधीकधी माझ्री चिडचिड होते.. लोकांच्या मागासलेपणाची किव येते..  चोरुन माझ्याशी संवाद साधताना त्यांना इतके सारे प्रश्न पडलेले असतात की त्यावेळी ...
टोमॅटो दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी या सोप्या ट्रिकचा वापर करा.! 
Article

टोमॅटो दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी या सोप्या ट्रिकचा वापर करा.! 

टोमॅटो दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी या सोप्या ट्रिकचा वापर करा.!   टोमॅटो हा आपल्या रोजच्या स्वयंपाकात लागणारा अतिशय महत्वाचा पदार्थ आहे. टोमॅटो शिवाय कोणताही पदार्थ बनवणे म्हणजे अपुरेच आहे. डाळ, भाजी, आमटी असे कोणतेही पदार्थ बनवायचे म्हटलं की टोमॅटो हा त्यातील एक महत्वाचा घटक मानला जातो.   टोमॅटो घातल्याने पदार्थांना आंबट गोड अशी चव येते. स्वयंपाक घरामधील कुठलीही भाजी किंवा रेसिपी करायचे असेल तर टोमॅटोची गरज भासतेच. त्यामुळे टॉमॅटोला स्वयंपाक घरातील बादशहा असे म्हटले जाते. टोमॅटो मध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन आणि कॅल्शियम असतात. त्यामुळे टोमॅटो आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे. आपल्या किचन मध्ये कांदा, बटाटा, टोमॅटो कायम उपलब्ध असतातच. तसे कांदा, बटाटा, टोमॅटो वर्षाचे बाराही महिने बाजारात विकत मिळतात. सध्याचा दिवसात टोमॅटोचा विचार केला तर टोमॅटोचे दर हे गगनाला भिडलेले आहेत.   सामान्य माणसाला स...
वर्तमानपत्राच्या तळाशी असणाऱ्या चार ठिपक्यांचे रहस्य.!
Article

वर्तमानपत्राच्या तळाशी असणाऱ्या चार ठिपक्यांचे रहस्य.!

वर्तमानपत्राच्या तळाशी असणाऱ्या चार ठिपक्यांचे रहस्य.!    अशा खूप कमी व्यक्ती असतील की, त्यांचे लक्ष वर्तमानपत्रात असणाऱ्या ४ ठिपक्यांकडे गेले असेल व त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की हे का असतात. आणि तुमचे लक्ष त्या ठिपक्यांकडे गेले तरी तुम्हाला त्याविषयी माहिती नसेल. आज आम्ही तुमच्या माहितीसाठी माहिती देत आहोत या ठिपक्यांविषयी.   वर्तमानपत्रातील 4 ठिपक्यांचे महत्व : प्रत्येक वर्तमानपत्रात खाली ४ ठिपके एका ओळीमध्ये असतात. तुम्हाला वाटलेही असेल की तर ठिपके ट्राफिक सिग्नल सारखे असतील, पण असे नाही.   पण याचा काय अर्थ आहे हे खूप कमी लोकांना माहिती असेल. या चार रंगाचे वर्तमानपत्रात खूप महत्व आहे. तुम्हाला माहिती असेलच की, मुख्य रंग तीनच आहे. ज्यामध्ये लाल, पिवळा आणि निळ्या रंगाचा समावेश आहे. या ठिपक्यामध्ये सुद्धा या 3 रंगाचा समावेश आहे आणि त्यात अजून एक काळा रंग ऍड झालेला आहे. या ठिप...
रोगप्रतिकारक शक्तीसाठी डाळ भात खा.!
Article

रोगप्रतिकारक शक्तीसाठी डाळ भात खा.!

रोगप्रतिकारक शक्तीसाठी डाळ भात खा.!भारतातील जवळ जवळ प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात बहुतेक डाळ आणि भात बनवले जातात. रोजच्या जेवणात डाळ-भात सर्वात लोकप्रिय आहे. चवीच्या दृष्टीने डाळ भात रुचकर असतो, तर आरोग्यासाठी डाळ-भात याचा हेल्दी फूड मध्येही समाविष्ट करता येतो. तज्ज्ञांच्या मते डाळ-भात मुलांच्या वाढीसाठी फायदेशीर आहेत.अशा परिस्थितीत मुलांना डाळ-भात खायला देण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय डाळ-भात खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. डाळ-भात हा प्रौढांसोबतच लहान मुलांच्या आरोग्यासाठी चांगला मानला जातो. डाळ (वरण) मध्ये अनेक पोषक घटक आढळतात, जे शरीराला ऊर्जा देण्यासाठी तसेच रोगप्रतिकारक शक्तीसाठी उत्तम असते. ज्यांना वजन नियंत्रणात ठेवायचे आहे किंवा वजन कमी करायचे आहे, त्यांनीही डाळ-भाताचे सेवन करावे.* डाळी मध्ये आढळणारे पोषक तत्व हे आरोग्यासाठी एक खजिना आहेत. डाळी मध्ये फायबर, ब-जीवनसत्त...
आंबेडकरवादी साहित्य हेच आमुलाग्र परिवर्तनाचे साहित्य
Article

आंबेडकरवादी साहित्य हेच आमुलाग्र परिवर्तनाचे साहित्य

आंबेडकरवादी साहित्य हेच आमुलाग्र परिवर्तनाचे साहित्य   १४ ऑक्टोबर १९५६ हा दिवस म्हणजे आमच्या उन्नतीचा नवायान होता . धवलमय धरतीवरील धम्मघोष निनादत  होता आणि अंधरूढीची सारी साखळदंड गळून पडले होते. मनूव्यवस्थेच्या पायावर उभ्या अशा हिंदू धर्मातला सोडून नव्या मनुष्यत्वाचा नवाबुद्ध माणूस तयार झाला होता. परिवर्तनाची सारी प्रभा आकाशावर कोरली गेली .कपोलकल्पित , ईश्वराधिष्ठ, अवैज्ञानिक विचारांना मूठमाती देऊन समतेचा धम्मसूर्य नव्याने तेजाळत होता. नागपूरच्या धम्मदीक्षेचा मंगलमय क्षण जगताच्या आकाशावर कोरला  होता .  तथागत गौतम बुद्ध यांचा बुद्ध धम्म हा मानवाची पुनर्रचना करणारा मानवतावादी धम्म आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, प्रज्ञा शील, करुणा यांची महाऊर्जा देणारा, स्वयं दीप व्हा..! असा संदेश देणार आहे. बौद्ध धम्म हा ब्राह्मणीकरण्याच्या प्रक्रियेने लयास गेला होता. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यां...
मदतीचे उपकार कोणी कोणाचे विसरु नये.!
Article

मदतीचे उपकार कोणी कोणाचे विसरु नये.!

मदतीचे उपकार कोणी कोणाचे विसरु नये.!   आपण कुणाला मदत करीत असतो. कशासाठी तर आपण कोणाचे तरी देणे लागतो. म्हणूनच आपण कुणाला मदत करीत असतो  उपकाराची भाषा करीत असतो. काही लोकं मात्र स्वार्थी असतात. ते कोणाकडून मदत तर घेतात. परंतु इतरांना मदत करतांना ते कोणत्याच स्वरुपाची मदत करीत नाहीत. ज्यांनी त्यांना मदत केली, त्यांनाही मदत करीत नाहीत.   मदतीबाबत सांगायचं झाल्यास आपल्याला ज्या विधात्यानं जन्म दिलाय ना. त्या विधात्यानंच आपल्याला इतरांना मदत करण्यासाठी पाठवले आहे. आपला जन्म जेव्हा होतो, तेव्हा आपण आपल्या मुठ्ठी बांधून येतो. ते मुठ्ठी बांधून आपला जन्म होण्याचं कारण काय? असा विचार कोणी केल्यास त्याचं कारण आहे की मी सर्वकाही या मुठ्ठीत जगाला वा सृष्टीला काही देण्यासाठी आलोय हे जगाला सांगणं आणि जेव्हा आपला मृत्यू होतो, तेव्हा आपण बंद मुठ्ठी करुन जात नाही. तेव्हा आपले हात हे पसरत असतात. याचाच अर्थ ...
डालड्याचा डब्बा..!
Article

डालड्याचा डब्बा..!

डालड्याचा डब्बा..! दिवाळी ज्या महिन्यांत असायची त्या महिन्याच्या वाण सामानाच्या यादींत एरवी न येणारे काजू, बेदाणे , बदाम पिस्ते ह्याबरोबरच डालडाचा एक मोठ्ठा डब्बा हमखास असायचा. दिवाळीत डालडाला अनन्य साधारण महत्व असायच.तेल आणि तूप ह्यामधला तो प्रकार, त्याचा तो दंडगोलाकृती आकाराचा पत्र्याचा  डबा, पिवळा रंग आणि त्यावरच ते ताडाच का खजुराच्या हिरव्या झाडाच रेखाचित्र......! एरवीही घरोघरी डालडा असायचाच, त्याचा  छोटा डबा रिकामा झाला की त्याच हमखास टमरेल व्हायच आणि दिवाळीत आलेला मोठा डबा रिकामा झाला की त्याची तुळशीची कुंडी व्हायची. तुळशीच लग्न लागून गेलं की त्या कुंडीतली ती तुळसाबाई बिचारी सुकून जायची आणि लाल  मातीने भरलेली ती डालडाच्या डब्याची कुंडी हळुहळू गंजत जायची....! डाएटीशियन नांवाच्या प्रजातीचा तेंव्हा उगम झालेला नव्हता त्यामुळे सर्वसामान्य माणसं  पानांत पडेल ते अन्न सुखाने खात होती. “कॅलरी...