अमरावतीत १७ मे रोजी चौथे परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलन | गझल मुशायरा व कवीसंमेलन
अमरावतीत १७ मे रोजी चौथे परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलन; गझल मुशायरा, परिसंवाद आणि कवीसंमेलनाची मेजवानीअमरावती : बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे स्मृतिदिन, क्रांतिवीर सुखदेवराव तिडके स्मृतिदिन आणि सूर्यभानजी मेश्राम यांच्या स्मृतिदिनानिमित्त शब्दास्त्र विचार मंच व बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १७ मे २०२६ रोजी चौथ्या परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कार भवन येथे सकाळी १०.३० वाजता सुरू होणार असून साहित्य, समाजप्रबोधन आणि परिवर्तनवादी विचारांचा संगम अनुभवायला मिळणार आहे.संमेलनाध्यक्ष म्हणून आंबेडकरी अभ्यासक प्रा. डॉ. अनंता सूर उपस्थित राहणार असून उद्घाटक म्हणून आंबेडकरी साहित्यिका सुषमा पाखरे भूमिका मांडतील. स्वागताध्यक्षपद माजी प्राचार्य डॉ. गोपीचंद मेश्राम भूषवणा...
