सोमनाथ पगार यांना ‘कारुण्यबोध’ कवितासंग्रहासाठी राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार
कराड : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत अनुदान प्राप्त साहित्यिक, गीतकार, कवी, ट्रान्सलेटर, ब्लॉगर, युट्युबर म्हणून आपली ओळख निर्माण केलेल्या नाशिक येथील सोमनाथ पगार यांना त्यांच्या ‘कारुण्यबोध’ या कवितासंग्रहासाठी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे राज्यस्तरीय स्व. राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कराड शहरातील वेणूताई चव्हाण स्मृती सदन येथे हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून साम टीव्ही न्यूजचे संपादक निलेश खरे, प्रेरणादायी वक्ते डॉ. विनोद बाबर, महंत अहिल्यागिरिजी महाराज, सुप्रसिद्ध गायक विजय सरतापे, दिग्दर्शक अरुण कचरे, उपविभागीय कृषी अधिकारी रियाज मुल्ला, पत्रकार सेजल पुरवार, सिनेअभिनेते योगेश पोवार, सिनेअभिनेत्री प्...
