शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार 2026 जाहीर
शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार 2026 जाहीरयेवला प्रतिनिधी : तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान आयोजित शहादू शिवाजी वाघ स्मृती पाचव्या राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्काराचे निकाल दि. ०१ मे २०२६ रोजी कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून निकाल जाहीर झाले असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय वाघ यांनी कळविले आहे.पिंपळगाव जलाल येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान आयोजित शहादू शिवाजी वाघ यांच्या स्मृतीदिनानिमित्त पाचव्या राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्काराचे नियोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातून कविता संग्रह- १०३, कथा संग्रह-४१, कादंबरी -२२ आणि ललित लेखसंग्रह- २० अशा एकूण १८६ साहित्य कलाकृती पुरस्कारासाठी प्राप्त झाल्या होत्या. या कलाकृतीतून प्रत्येक साहित्य प्रकारातील कलाकृतीला खालीलप्रमाणे पुरस्कार जाहीर झालेले आहेत.कविता...
