Monday, October 27

Tag: सल्ले

कौटुंबिक न्यायालयातील दिलेत दहा सल्ले !
Article

कौटुंबिक न्यायालयातील दिलेत दहा सल्ले !

कौटुंबिक न्यायालयातील दिलेले दहा सल्ले ! १) तुमच्या बरोबर एकाच घरात राहण्यासाठी मुलगा व सुनेला प्रोत्साहन देऊ नका, उलट, त्यांना नवे घर घेऊन त्या ठिकाणी राहायला जाण्याची सूचना करा. वेगळे घर घेणे शक्य नसेल तर अगदी त्यांनी भाड्याने घर घ्यावे. वेगळे घर शोधणे ही त्यांची जबाबदारी आहे. तुमची नाही. मुलाचे कुटुंब व तुमच्या मध्ये जितके अंतर असेल तितके तुमचे नाते चांगले राहील.२) तुमच्या मुलाची पत्नी ही त्याची पत्नी आहे. हे लक्षात घेऊन तिच्याशी वागा. ती तुमची मुलगी किंवा मैत्रीणीच्या नात्याने तिच्याशी वागायला जाऊ नका. तुमचा मुलगा नेहमीच तुमच्यासाठी लहान असतो. पण सुनेचे तसे नसते. मुलावर रागवता म्हणून सुनेवर रागावला तर ती कायम लक्षात ठेवते. खऱ्या आयुष्यात फक्त तिची आईच तिला रागावू शकते किंवा चुका सुधारू शकते.३) तुमच्या मुलाच्या पत्नीच्या सवयी, वागणे ही तुमची समस्या नाही. ती तुमच्या मुलाची समस्या आहे...