फुकट संस्कृतीच्या…घो..!
फुकट संस्कृतीच्या...घो..!
१९७२ मध्ये राज्यात मोठा दुष्काळ पडला होता. पाणी होतं, पण लोकांना खायला अन्न नव्हतं. अमेरिकेकडून निकृष्ट गहू व लाल ज्वारी (मिलो) याची. तत्कालिन मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईकांनी प्रथमच कायदा करून तत्कालीन विधानसभा सभापती वि. स. पागे यांनी तयार केलेली रोजगार हमी योजना (रोहयो) विधानसभेत मांडून मागेल त्याला काम यासाठी 'रोजगार हमी योजना' कायदा केला. त्या वेळी रोजगार हमीतून रस्ते, तलाव, बंडींग, नाला बंडींग अशी विकासाची अगणित कामे झाली. लोकांना 'श्रमाच्या' मोबदल्यात कामाच्या हिशोबाने सरकारने धान्य व पैसे दिले.
सरकारने त्या वेळी मनात आणलं असतं तर आजच्या राज्यकर्त्यांसारखे धान्य व पैसे लोकांना फुकट वाटू शकले असते. परंतु त्यावेळचे राजकारणी धोरणी व व्यवहारी होते. या संकटाचे त्यांनी संधीत रूपांतर केले. भिषण दुष्काळात लोकांना सरकारने जगवीले आणि त्या बदल्यात त्यांनी लोकांकडून व...
