Monday, October 27

Tag: संस्कृती

ग्रामीण संस्कृती ; काळाचा महिमा
Article

ग्रामीण संस्कृती ; काळाचा महिमा

ग्रामीण संस्कृती ; काळाचा महिमाफार पुर्वीचा काळ.गावातील कुणीतरी एखाद दुसरा माणुस पुण्या- मुंबईला असायचा.आमच्या गावातील बरेच लोक तेव्हा भिवंडी येथे कामधंद्यासाठी होते.काही लोक शेतीची कामे उरकुन भिवंडी येथे कामासाठी जात असत.त्यामुळे त्यांचे गावी येणे जाणे असे.ज्यांचे कुणी मुंबई,भिवंडीला असे त्यांच्यासाठी त्यांचे लोक रानभाज्या आळवडीची पाने,करटुली,चाव्याचा बार,चाव्याची भाजी,हारब-याची भाजी, हरभरा किंवा गव्हाचा हुळा,तांदुळ व खोब-याची वाफोळी,काकडीची पिसोळी तांदुळ वगैरे गावाहुन पाठवत असत.तसेच एखादी चिठ्ठी लिहुन दिलेली असे.त्याच बरोबर मुंबई किंवा भिवंडीहुन एखादा माणुस गावी जाणार आहे असे समजताच तिकडे राहणारे लोक आपापल्या गावी राहणाऱ्या नातेवाईक,आई वडील,भाऊ वगैरे लोकांना थोडेफार पैसे देण्यासाठी आदल्या दिवशी गर्दी करत.सोबत एखादी चिठ्ठीही पाठवत.त्याबरोबर चहापावडर, एखाद डझन कपड्याचे / अंगाचे साबण,...
बंजारा भाषा, साहित्य व संस्कृती ऐतिहासिक ठेवा 
Article

बंजारा भाषा, साहित्य व संस्कृती ऐतिहासिक ठेवा 

गोरबंजारा अकादमी : बंजारा भाषा, साहित्य, संस्कृतीसाठी ऐतिहासिक ठेवा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बंजारा समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून बंजारा साहित्य, संस्कृती व कला ही भारतीय विविधतेला समृद्ध करणारी एक वैशिष्ट्यपूर्ण ठेवा आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात बंजारा लोकसाहित्य टिकून आहे. बंजारा भाषिकांची संख्याही राज्यात मोठयाप्रमाणात आहे. राज्यात सिंधी, ऊर्दू,  गुजराती अकादमी स्थापन केल्या गेली, परंतु बहुसंख्येने असलेल्या व समृद्ध लोकसाहित्य व संस्कृती असणाऱ्या बंजारा भाषिकांसाठी अकादमी नसल्याची वेदना प्रख्यात साहित्यिक एकनाथ पवार यांनी पुसद येथील एका बैठकीत बोलून दाखवली होती. त्यासाठी साहित्य संस्कृती क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत एक सभा आयोजित करण्याचे त्याचवेळी ठरविण्यात आले.  बंजारा साहित्य संस्कृती व कलेसाठी एक शाश्वत मंच असावे. भारतीय विविधतेत इतर भाषिकासह सुसंवाद साधत बं...
बौद्ध संस्कृती आणि संस्कार
Article

बौद्ध संस्कृती आणि संस्कार

बौद्ध संस्कृती आणि संस्कार बौद्ध धर्म उदयास आल्या पासून बौद्ध संस्कृतीचे संस्कार उदयास आले. वयाच्या ऐंशीव्या वर्षापर्यंत सतत पायी फिरून बुद्धांनी त्यांच्या धम्माचा प्रचार प्रसार केला. बुद्धाच्या जीवन काळामध्ये धम्म वेगाने वाढून पुढे राजाश्रय मिळाल्यामुळे अधिक भरभराटीस आला. अनेक राज्यांनी बौद्धधर्म स्वीकारल्यामुळे प्रजाही बौद्ध बनली होती. बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर ही अनेक राजाद्वारे बुद्धाच्या अस्थींच्या रूपाने स्तुपांची निर्मिती करण्यात आली. बुद्धाची प्रतिमा तयार करण्यात आली. श्रद्धा भाव व्यक्त करण्यासाठी पालि गाथांची निर्मिती करण्यात आली. बुद्धांचा उपदेश ताडपत्र्यावर, झाडांच्या सालीवर, पुढे पाषाणावर कोरण्यात आलेले होता व त्यानुसार बुद्धाचे अनुयायी आचरण करीत असे. सम्राट अशोकाच्या काळात तर बुद्ध धर्माला फारच भरभराटीचे दिवस आले होते. बुद्धाच्या अस्तिवर चौर्‍याऐंशी हजार स्तूप निर्माण करून...