शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज
महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा अतिशय चिंतनाचा व चिंतन करणारा विषय आहे. नैसर्गिक आपत्ती नापिकी सावकारांचे आणि बँकांचे कर्ज वसुलीसाठी तगादा मुलीचे लग्न आजारपण यास अन्य कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करत आहे. शासन कितीही दवा करीत असले तरी शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबलेले नाही राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सतत सुरूच आहे. सन २००१ ते आतापर्यंत तब्बल १९,७११ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत.
राष्ट्रीय गुन्हे शाखेच्या अहवालानुसार २०२१ मध्ये देशात एकूण १० हजार ८८१ शेतकरी आणि शेतमजुरांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी राज्यात २६४९ शेतकरी आणि १४२४ शेतमजुरांच्या आत्महत्यांची नोंद झाली आहे. यंदा जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत राज्यात २१३८ शेतकरी आत्महत्या झाल्या. सर्वाधिक १०७७ आत्महत्या या विद...
