अखेर शकुंतला रेल ब्रॉडगेजला डीपीआर मंजूरी – शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीचा ऐतिहासिक विजय
अखेर शकुंतला रेल ब्रॉडगेजला डीपीआर मंजूरी – शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीचा ऐतिहासिक विजयअखेर शकुंतला रेल ब्रॉडगेज प्रकल्प मार्गी | अचलपूर-मूर्तिजापूर रेल्वे प्रवासाची नवी दिशागौरव प्रकाशनAmravati News अमरावती (प्रतिनिधी) : गेल्या सात वर्षांपासून आंदोलनाच्या ज्वाळांवर उभी असलेली शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समिती अखेर यशाच्या मार्गावर पोहोचली आहे. शकुंतला रेल्वे ब्रॉडगेज प्रकल्पाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे डीपीआर (Detailed Project Report) मंजूर झाला असून अचलपूर-मूर्तिजापूर रेल्वेच्या भवितव्याला आता नवी दिशा मिळाली आहे.सात वर्षांचा सत्याग्रह अखेर फळाला2018 साली सुरु झालेल्या या लढ्याने आज ऐतिहासिक यश मिळवले. सात वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर समितीने सरकारचे लक्ष वेधून घेतले. या काळात रेल्वे विभागाला सातत्याने पत्रव्यवहार, मोर्चे, उपवास व विविध अहिंसक मार्गांनी आं...

